Parbhani Congress News : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार परभणीत अन् पक्षाचे प्रतोद वरपूडकरच गायब...

MLA Suresh Warpudkar News : वरपूडकर राजकारणातील बदलत्या हवेचा अचूक अंदाज घेण्यात तरबेज आहेत.
Parbhani Congress News
Parbhani Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नुकत्याच झालेल्या परभणी दौऱ्यात कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद परभणीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. (Parbhani Congress News) विरोधी पक्षनेतेपद व मुख्य प्रतोद या हे महत्वाचे समजले जाते. या दोन्ही पदाच्या नेत्यांमध्ये समन्वय असणेही गरजेचे असते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नुकताच परभणी जिल्हा दौरा केला. वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरासंदर्भात केलेल्या वक्तव्याने हा दौरा गाजत असतानाच त्यांच्या या दौऱ्यात पक्षाचे मुख्य प्रतोद काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार सुरेश वरपुडकर (Suresh Warpudkar) कुठेच दिसले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहेत.

Parbhani Congress News
Wadettiwar on Fadnavis : अंतरवालीतील लाठीचार्जची चौकशी होणे गरजेचेच!

सुरेश वरपुडकर हे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही आहेत. (Congress) परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सप्टेंबर महिन्यात वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे यांचे छायाचित्र असल्याने ही जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती.

वरपुडकर काही वेगळा निर्णय घेतात का ? अशा शंकाही उपस्थित केल्या जाऊ लागल्या होत्या. मात्र असे काही घडले नाही आणि काँग्रेसच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला. परंतु महिन्याभरातच वरपुडकर यांच्या संचालकपदावर कारवाई झाली आणि संचालक म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आले. संचालक पद गेल्याने वरपूडकर यांचे अध्यक्षपदही धोक्यात आले होते. मात्र वरपुडकरांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली आणि अपात्रतेच्या कारवाईवर स्थगिती मिळवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वरपुडकर हे जिल्ह्यातील मुरब्बी राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या वरपुडकरांनी योग्य वेळ येताच कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याशी हातमिळवणी करत पाथरी विधानसभेची उमेदवारी मिळवली व विजयही मिळवला. जिल्हा मध्यवर्ती बँक, परभणी महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व असलेले वरपुडकर राजकारणातील बदलत्या हवेचा अचूक अंदाज घेण्यात तरबेज आहेत.

त्यामुळे बँकेच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे छायाचित्र असण्यामागे निश्चितच राजकीय गणित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील दलित आणि मुस्लीम मतदार ही वरपुडकर यांची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याने कॉंग्रेस पक्षाशिवाय दुसरा पर्याय निवडणे त्यांना राजकीय नुकसानीचे ठरू शकले असते. कदाचित यामुळेच त्यांनी वेगळा निर्णय घेण्याचे टाळल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com