Congress : राज्यपालांना हटवा, आफताबला फाशी द्या ; काॅंग्रेसची मागणी..

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवून आरोपी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी, हीच प्रत्येकाची भावना आहे. (Ashok Chavan)
Congress Protest Against Governor News, Nanded
Congress Protest Against Governor News, NandedSarkarnama

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी राज्यपाल हटावची मागणी होत आहे. राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.

Congress Protest Against Governor News, Nanded
Abdul Sattar : कृषीमंत्र्यांचा एक फोन अन् महावितरणची वसुली मोहिम गुंडाळली..

तर दुसरीकडे श्रद्धा वालकर या तरुणीचा लव्ह जिहादच्या प्रकरणातून आफताब नावाच्या तरुणाने निर्घृण हत्या केली. याचे देखील पडसाद देशभरात उमटत आहेत. (Ashok Chavan) या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये आज जिल्हा काॅंग्रेसच्या (Congress) वतीने निदर्शने करण्यात आली.

माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्यपाल हटवा, आफताबला फाशी द्या, अशी मागणी देखील करण्यात आली. छत्रपत्री शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेली विधाने संतापजनक असून, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. केंद्र सरकारने विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे, अशी आमची मागणी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या अवमानकारक असल्याचे चव्हाण म्हणाले. श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी निषेध नोंदवून आरोपी आफताबला फाशी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवून आरोपी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी, हीच प्रत्येकाची भावना आहे. ज्या निर्घूण पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे, ते पाहता कायदेशीर प्रक्रियेने आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सर्व देशवाशियांची भावना असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com