Congress News : 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होण्याआधीच नव्यांचा शोध सुरू

Congress MLA Cross Voting in MLC Election : एकीकडे आमदारांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवत काँग्रेसमधील वरिष्ठांनी 'गद्दार' आमदारांवर दबाव वाढवल्याचे चित्र आहे.
jitesh antapurkar nana patole mohan hambarde
jitesh antapurkar nana patole mohan hambardesarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारत सात आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. यात सात आमदारांवर तातडीने कारवाई करावी, यासाठी पक्षातील इतर आमदारांनी राज्यातील नेत्यांवर दबाव वाढवला आहे.

सात गद्दार आमदारांमुळे 30 प्रामाणिक विधानसभा सदस्यांवर अन्याय नको, असा सूर पक्षातील इतर सदस्यांकडून निघत आहे.

एकीकडे पक्षश्रेष्ठींनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'कडक' संदेश देण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ही कारवाई होण्याआधाची काँग्रेसमधील त्या त्या विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल करायला सुरूवात केली आहे.

jitesh antapurkar nana patole mohan hambarde
Congress Cross Voting : 'क्रॉस व्होटिंग' प्रकरण तापलं! काँग्रेस आमदारानं नाना पटोलेंना घेतलं शिंगावर; पक्षाला 'हात' दाखविणार?

मराठवाड्यातील देगलूर-बिलोलीचे काँग्रेस (Congress) आमदार जितेश अंतापूरकर, नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे यांची नावे 'क्रॉस व्होटिंग' केलेल्या आमदारांच्या यादीत असल्याचा दावा केला जात आहे. यातील आमदार मोहन हंबर्डे यांनी आपण काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत, आपल्या रक्तात काँग्रेस असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. तर, जितेश अंतापूरकर यांनी मात्र या विषयावर कुठलेही भाष्य करणे टाळलेले आहे.

एकीकडे आमदारांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवत काँग्रेसमधील वरिष्ठांनी 'गद्दार' आमदारांवर दबाव वाढवल्याचे चित्र आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती अब्दुल समद यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती आहे.

तर, देगलूर विधानसभा मतदारसंघात माजी अप्पर आयुक्त व्यंकटरावर वरवंटकर, निवृत्ती कांबळे, माजी नगरसेवक धोंडीबा कांबळे, उद्योगपती दिपक रामपूरकर, निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एम.बी.कांबळे, निवृत्त अधिकारी गिरकर यांच्यासह अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याची माहिती आहे.

jitesh antapurkar nana patole mohan hambarde
Assembly Election 2024 : मावळची जागा आपल्याकडे खेचण्याची काँग्रेसला संधी? असं असेल विधानसभेचं 'गणित'

विद्यमान आमदारांवर कारवाईचे संकेत मिळत असल्याने इच्छुकांची गर्दीही वाढलेली पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठवाड्यात घवघवीत यश मिळाले. लातूर, नांदेड, जालना या तीन मतदारसंघात काँग्रेसचे खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत.

महाविकास आघाडीतील विशेषतः काँग्रेसला राज्यात व मराठवाड्यात पोषक वातावरण असताना 'क्रॉस व्होटिंग' प्रकरणाने ते बिघडू नये याची काळजी राज्यातील आणि केंद्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेताना दिसत आहे. 'गद्दार' आमदारांना दणका देत वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'पळापळी' करणाऱ्यांना गंभीर इशारा देऊ पाहत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com