Nanded Congress News : नांदेड मतदारसंघातील महिला मतदारांवर काँग्रेसचा 'वॉच'

Political News : काँग्रेसने खास महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
nanded Congress Program
nanded Congress Program Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नांदेड जिल्ह्यातील बारा लाख महिला मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्याचा खासदार ठरवण्यात या महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली असून रविवारी खास महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात आवर्जून जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येचा उल्लेख करत स्त्रीशक्तीला माझा नमस्कार, असे म्हणत महिलांच्या प्रश्नांवर भर दिला.

नांदेड जिल्हा व शहर महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), सहप्रभारी आशिष दुवा यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने या देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पंतप्रधान दिल्याचा उल्लेख करीत केंद्रातील मोदी सरकारकडून रामाच्या नावावर राजकारण करीत असल्याचा आरोपही केला.

महिला मेळाव्याला महिलांची संख्या पाहून आता खऱ्या अर्थाने आम्हाला आरक्षणाची गरज आहे, अशी मिश्किल टिप्पणी चव्हाण यांनी केली. देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पंतप्रधान काँग्रेसने दिल्या.

nanded Congress Program
Maratha Reservation Benefit : 'मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा शिंदेंच्या शिवसेनेला फायदा; तर भाजपचा दुहेरी तोटा’

महिलांचे सबलीकरण, अधिकार, समान संधी देण्याची भूमिका काँग्रसेने कायम घेतली. नांदेड जिल्ह्याच्या मतदानात महिलांचा पन्नास टक्के वाटा आहे. नांदेड जिल्ह्यात 12 लाख 90 हजार मतदार आहेत. त्यामुळे माझा तुम्हाला जाहीर नमस्कार, असे म्हणत चव्हाण यांनी महिलांना अभिवादन केले.

आपण भक्कमपणे, ताकदीने एकत्रित येऊन शंकरराव चव्हाण यांनी बांधलेली काँग्रेस आगामी काळात नवीन पिढी आणि आमच्या भगिनी प्रचंड ताकदीने जिल्ह्याच्या मागे उभ्या राहतील, असा मला विश्वास आहे. महिलांना राजकारणात 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेसनेच घेतला. केंद्राने महिला आरक्षण जाहीर केले असले तरी त्यासाठी तुम्हाला 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे ताटात वाढलेली पुरणपोळी आठ दिवसांनी खा, असे सांगण्याचा हा प्रकार असल्याचा टोला चव्हाण यांनी यावेळी लगावला.

गॅस महागला, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले. निवडणुका होत्या तेव्हा केंद्राने दर कमी केले, निवडणुका जिंकल्या आणि पुन्हा वाढवले. महागाईचा फटका सगळ्यात जास्त आमच्या भगिनींना बसतो आहे. नवऱ्याने आणून दिलेला पगार पुरत नाही, डब्यात ठेवायला काहीच शिल्लक राहत नाही, हा महागाईचा परिणाम आहे. उत्पन्नात मात्र वाढ नाही, अशी परिस्थिती सामान्य माणसाची झाली आहे. पण केंद्र सरकारला याच्याशी काही देणंघेणं नाही, त्यांना फक्त राम मंदिराची चिंता लागली आहे, असा टोलाही चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्हीही रामाला मानतो, पण रामाचा वापर मतपेटीसाठी करणार नाही. आमच्या मनात राम आहे, त्याला मतपेटीत न्यायची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, तेव्हाच राम मंदिराचा मुद्दा संपला. पण भाजपकडून रामाचा वापर राजकारणासाठी केला जातोय, अशी टीका चव्हाण यांनी केली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा काँग्रेसने आणला, माहिती अधिकाराचा कायदा, राजीव गांधी जीवनदायी योजना मी मुख्यमंत्री असताना आणली, याचा मला अभिमान आहे. आता या योजनेचं नाव सरकारने बदलले. कर्जमाफीचा निर्णय केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने आणि राज्यात आम्ही घेतला. याची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे आवाहनही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी महिला मेळाव्यात केले.

R...

nanded Congress Program
Ashok Chavhan : "सामान्य लोकांचा पैसा बुडणार असेल तर.." ; अदानी प्रकरणी चव्हाण काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com