Anjali Ambedkar On Book : बाळासाहेब आंबेडकरांचा वाढता प्रभाव थोपविण्यासाठी अपप्रचाराचे षडयंत्र..

VBA : मुस्लिम बांधव एका हाती संविधान आणि एका हाती बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलन करीत आहेत.
Anjali Ambedkar On Book, News
Anjali Ambedkar On Book, NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अपप्रचारास परकीयांपेक्षा स्वकीय आघाडीवर असून बीएसपी, बामसेफ पक्ष-संघटनांनी बाळासाहेबांवर व्यक्तिगत व कौटुंबिक टीका केली व करत आहेत, अशी टीका प्रा.अंजली आंबेडकर (Pro. Anjali Ambedkar) यांनी केली. या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची बुद्धिजीवी वर्गावर मोठी जबाबदारी असल्याचेही त्या म्हणाल्या.

Anjali Ambedkar On Book, News
Amarsinh Pandit On Kendrekar : केंद्रेकरांच्या सूचनेचे सर्वत्र कौतुक, पण अमरसिंह पंडित म्हणतात, दहा हजारच का ?

रमाई प्रकाशन प्रकाशित आणि डॉ. संजय मून लिखित `ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रचार व अपप्रचार`, (Prakash Ambedkar) या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. आंबेडकर म्हणाल्या की, पारंपरिक आंबेडकरवादी नसलेले समूह आज बाबासाहेब स्वीकारत आहेत, आंबेडकरी विचारधारेशी जुळवू पाहत आहेत.

मुस्लिम बांधव एका हाती संविधान आणि एका हाती बाबासाहेबांचा फोटो घेऊन आंदोलन करीत आहेत, हे परिवर्तन आम्ही स्वीकारणार आहोत की नाही? ज्या-ज्या वेळी बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकारणातील प्रभाव वाढू लागला त्या-त्या वेळी अपप्रचार केला. (Marathwada) राजकीय व्यक्तीची बदनामी करणे ही त्या व्यक्तीला राजकारणातून संपविण्याची शेवटची पातळी आहे. (Maharashtra) अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्यात प्रसारमाध्यमांचाही वाटा असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.

मून म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपाला, बदनामीला उत्तर देण्याची क्षमता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावी, सत्य निर्भीडपणे मांडता यावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली. या पुस्तकाचा फुले-आंबेडकरी राजकारण सक्षम होण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com