Conversion: आम्ही हिंदूच, कधी धर्म बदलला नाही,बदलणारही नाही..

फक्त देवदर्शनासाठी पैठणमध्ये गेलो होतो. संत एकनाथ मंदीरात येणाऱ्या सर्वांचा सत्कार होत असेल म्हणून आमचा सत्कार झाला असावा, असे आम्हाला वाटले. (Conversion)
Conversion In paithan

Conversion In paithan

Sarkarnama

Published on
Updated on

जालना : मंठा तालुक्यातील १२ कुटुंबातील ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद काही केल्या थांबत नाहीये. (Conversion) ख्रिश्चन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षांनी या धर्मांतरावर (Paithan) आक्षेप घेतल्यानंतर यातील चौदा जणांनी देखील आम्ही कुठल्याही प्रकारचे धर्मांतर केले नाही, किंवा धर्म बदलला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. (Marathwada)

पैठणच्या नाथमंदिरात गेल्यानंतर आमचा तिथे सत्कार करण्यात आला. इथे येणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्याची प्रथा असावी, असे समजून आम्ही तो स्वीकारला एवढेच, असा खुलासा देखील या कथित धर्मांतर केलेल्यापैकी चौदा जणांनी केला आहे.

शनिवारी पैठणच्या नाथ मंदिरात नाथ वंशजाच्या उपस्थितीत मंठा तालुक्यातील १२ कुटुंबातील ५३ जणांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केल्याचे समोर आले होते. नाथ मंदिरात नाथवंशज आणि इतरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या धर्मांतर सोहळ्याचे फोटो आणि बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये प्रसिध्द झाल्या होत्या.

परंतु असे कुठलेही धर्मातर झालेच नाही असा दावा आता ज्यांनी धर्मातर केल्याचा दावा केला जातोय, त्यातीलच चौदा जणांनी केला आहे. आम्ही धर्मांतर केलेलंच नाही, पैठणमध्ये फक्त आमचा सत्कार झाल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. पैठणमध्ये देवदर्शनासाठी गेलो होतो, तिथे फक्त आमचा सत्कार झाला.

आम्ही कोणतंही धर्मांतर केलेलं नाही आणि धर्म आधीही बदलेला नव्हता आणि कधी बदलणारही नाही, असेही जालन्यात परतलेल्या या चौदा जणांनी स्पष्ट केले आहे. आम्ही एकाच कुटूंबातील १४ जण फक्त देवदर्शनासाठी पैठणमध्ये गेलो होतो. संत एकनाथ मंदीरात येणाऱ्या सर्वांचा सत्कार होत असेल म्हणून आमचा सत्कार झाला असावा, असे आम्हाला वाटले असे सांगत या सगळ्यांनी धर्मांतराच्या चर्चा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>Conversion In paithan</p></div>
Dhiraj Deshmukh:केंद्राने सोयापेंडवर लावलेली 'स्टॉक लिमिट'राज्यात लागू करू नका

तत्पुर्वी कालच ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी देखील या धर्मांतर सोहळ्यावर आक्षेप घेत ज्यांचे धर्मांतर केल्याचा दावा केला जातोय ते ख्रिश्चन नाहीतच, त्यांचे जातीचे प्रमाणपत्र तपासा. बाप्तिस्मा केल्याशिवाय कुणाला ख्रिश्चन होता येत नाही, मग यांच्याकडे बास्तिस्मा केल्याचे प्रमाणपत्र आहे का? असा सवाल करत हा ख्रिश्चन धर्मीयांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com