महिलांना घरात घुसून धमकावल्या प्रकरणी तहसिलदार खाडे यांच्यासह इतरांवर गुन्हा

वाळू माफिया विरुद्ध पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा दाखल करू नये म्हणून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मी कोणाच्या घरी गेलो नाही व धमकावले देखील नाही. ( Beed District)
Sachin Khade, Tahsildar,Georai,Beed
Sachin Khade, Tahsildar,Georai,BeedSarkarnama
Published on
Updated on

गेवराई : कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना धमकावल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींवर गेवराई पोलीस ठाण्यात शुक्रवार (ता.18) फेब्रुवारी रोजी रात्री वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Beed)

सचिन खाडे यांना गुरुवारी वाळू माफियांनी धमकावले व कार्यालयात जाण्यापासून रोखले होते . या घटनेनंतर तीन महिलांनी खाडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. (Marathwada) या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून आता वाळूचा वाद घरापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. (Sand Mafiya)

कुसूम शिवाजी मोटे, स्वाती सोमनाथ गिरगे, सुनीता सुरेश भुंबे ( सर्व रा.गेवराई ) अशी फिर्यादी महिलांची नावे आहेत. तिन्ही तक्रारीनुसार तहसीलदार सचिन खाडे हे सहा ते सात जणांना सोबत घेऊन आले. गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरातील कोणत्याही व्यक्तींची परवानगी न घेता घरात प्रवेश केला.

महिलांना तुम्ही वाळू प्रकरणातील आरोपी लपवून ठेवले असे म्हणत धमकावले. याप्रकरणी तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सहा ते सात जणांविरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.

Sachin Khade, Tahsildar,Georai,Beed
राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी शिवसेनेने भाजपशी छुपी युती केली

वाळू माफिया विरुद्ध पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा दाखल करू नये म्हणून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मी कोणाच्या घरी गेलो नाही व धमकावले देखील नाही अशी प्रतिक्रिया तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com