राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी शिवसेनेने भाजपशी छुपी युती केली

महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगाची आठवण शिवसेना 'अंधारात साटेलोटे करून, उजेडात मोथुर लावणाऱ्या' बीडच्या नेत्याला करुन देणार का ? (Ncp, Mehboob shaikh)
Ncp, Mehboob shaikh
Ncp, Mehboob shaikhSarkarnama
Published on
Updated on

बीड : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना शिरुर कासार या आपल्या गावातच पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. (Beed) मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होऊन गुन्हे दाखल झाले. (Shivsena) तरी देखील पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण शेख यांना आपल्याच गावची नगरपंचायत जिंकता आली नाही. (Mehboob shaikh)

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील राथ्ट्रवादीचे अस्तित्व कुठे दिसले नाही. परंतु आपल्या विरोधात राज्याच्या सत्तेत असललेल्या शिवसेनेने-भाजपशी छुपी युती केली होती, असा आरोप मेहबूब शेख यांनी आपल्या फेसबुक पेजवरून केला. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिरुर कासार नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीला हरवण्यासाठी शिवसेना भाजपची छुपी युती आज उघड झाली. आज भाजपा सोबत अधिकृत गटात शिवसेना नगरसेवक गेले! त्यांच्या या भाजपा सोबत जाण्याने निवडणुकीच्या पूर्वीच असलेल्या छुप्या युतीचे कारस्थान जनतेच्या समोर व पक्षनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कारयकर्त्यांच्या समोर उघड झाले आहे.

यांच्या स्वार्थी छुप्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ जागा पाडण्याचे काम केले. पडद्यामागचे कारस्थान आज शिवसैनिकांच्या समोर उघडे पडले हे बरं झालं. कारण शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब हे भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी एकीकडे कष्ट घेत आहेत; तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील स्वार्थी नेते, माज़ी मंत्री निवडणुकीच्या पूर्वीच भाजपच्या माज़ी मंत्र्या सोबत छुपी युती करत होते.

Ncp, Mehboob shaikh
शिवसेना आमदाराची भावजयीला बेदम मारहाण; 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

आज हेच अतिनिष्ठावंत लोक निकालाच्या नंतर उघड भाजपा सोबत जात नवा संसार थाटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी दोन माजी मंत्र्यांना एकत्रित यावे लागले. चोरी छुपी करत व सेनेचा विचार डावलून गद्दारी केली याचा विचार शिवसेना करेल काय हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे.

महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगाची आठवण शिवसेना 'अंधारात साटेलोटे करून, उजेडात मोथुर लावणाऱ्या' बीडच्या नेत्याला करुन देणार का ? हा यक्ष प्रश्न या निमित्ताने पडला आहे! महेबूब शेख यांच्या या आरोपानंतर आता शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com