Petition in case of stick attack : मराठा आंदोलन प्रकरणात फौजदारी जनहित याचिका..

Jalna Maratha Protest : मारहाण प्रकरणात जे अधिकारी, पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे.
Jalna Protest News
Jalna Protest NewsSarkarnama

High Court News : अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Jalna Maratha Protest News) फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. देविदास आर. शेळके यांनी `पार्टी इन पर्सन` ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.

Jalna Protest News
Pankaja Munde Parikrama Rally : धाराशिव दौऱ्यात पंकजा मुंडेंनी ठेवली जुन्या सहकाऱ्याची आठवण...

अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी जवळपास १५०० पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या आंदोलनकर्त्यांवर अतिशय निर्दयी पद्धतीने लाठीहल्ला केला. (High Court) आंदोलन उधळून लावण्यासासाठी आंदोलकांवर अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या आणि गोळीबार केला. (Aurangabad) आंदोलकांच्या अंगावर छर्रे झाडण्यात आले. अनेक आंदोलकांना पोलिसांनी घरात घुसून मारले.

त्यामध्ये शंभरपेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले. या अमानुष मारहाणीत अनेक आंदोलक गंभीररित्या जखमी झाले असल्याचे याचिकेत म्हटले आहे. (Maratha Reservation) जीव वाचवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात दहा-बारा पोलिस जखमी झालेत. त्याविरोधात पोलिसांनी सातशे पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले.

मात्र, पोलिसांनी आंदोलकांवर जो निर्दयी हल्ला केला आणि ज्या अधिकाऱ्यांच्या तोंडी अथवा लेखी आदेशाने हा हल्ला करण्यात आला त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मारहाण प्रकरणात जे अधिकारी, पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची तटस्थ आणि पारदर्शीपणे न्यायालयीन समितीच्या माध्यमातून चौकशी करावी. ज्या आंदोलकांना मारहाण झाली किंवा जखमी झाले त्यांच्या मुलभूत आणि मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झालेले असल्याने त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या फौजदारी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com