Punyasloka Ahilya Devi Jayanti News : काठी अन् घोंगडं देवून युवराज भुषणसिंहराजे होळकर यांचे स्वागत..

Marathwada : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या भल्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
Punyasloka Ahilya Devi Jayanti News
Punyasloka Ahilya Devi Jayanti NewsSarkarnama

Marathwada : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २८९ व्या जयंती निमित्त आज लातूर येथे होळकर घराण्याचे तेरावे वंशज युवराज भुषणसिंहराजे यांनी हजेरी लावली. (Latur News) यावेळी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्यासह युवराज भुषणसिंहराजे यांचे काठी अन् घोंगड देवून स्वागत करण्यात आले.

Punyasloka Ahilya Devi Jayanti News
Sanjay Shirsat On Sanjay Raut : बस्स झालं, राऊत नावाचा भोंगा बंद केला नाही, तर शिरसाट नाव सांगणार नाही..

आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतीनिमित्त आज लातूर (Latur) येथे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित सोहळ्यात युवराज भुषणसिंहराजे होळकर (होळकर घराण्यातील १३वे वंशज), माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदारअभिमन्यू पवार, धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) सहभागी झाले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. (Marathwada) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या भल्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

राज्यकारभार आणि न्यायदानात त्या अतिशय निष्णात होत्या. विपुल जनकार्याद्वारे कुशल प्रशासनाचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला. जो कायम आपल्याला प्रेरणा देत राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार मा. त्र्यंबक भिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, आबासाहेब पाटील, विलास को. ऑप बँकेचे संचालक चंद्रकांत धायगुडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com