Beed News : वाल्मीक कराडपासून दादासाहेब खिंडकरच्या जि‍विताला धोका, पत्नीचे अधीक्षकांना पत्र!

Dadasaheb Khindkar’s life is under threat from Valmik Karad, and his wife has sent an urgent letter to the prison superintendent regarding the matter. : दादासाहेब खिंडकर हा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू आहे. देशमुख खुन प्रकरणातील प्रत्येक आंदोलन व इतर प्रक्रियांमध्ये खिंडकर देशमुख यांच्यासेाबत असे.
Dadasaheb Khindkar-Walmik Karad News
Dadasaheb Khindkar-Walmik Karad NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपींपासून आपले पती दादासाहेब खिंडकर यांच्या जिवीताला धोका असल्याची भिती अश्‍विनी खिंडकर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी कारागृह अधीक्षकांना निवेदन देऊन सुरक्षेसाठी गार्ड देण्याची मागणीही केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड (Walmik Karad), सुदर्शन घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आदी आरोपी जिल्हा कारागृहात आहेत. तर, ओंकार सातपुते मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्याने दादासाहेब खिंडकरसह इतर आरोपींवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात कट रचून अपहरण व जिवे मारण्याच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला.

त्याची 10 दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याचीही जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. (Beed News) दादासाहेब खिंडकर हा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडू आहे. देशमुख खुन प्रकरणातील प्रत्येक आंदोलन व इतर प्रक्रियांमध्ये खिंडकर देशमुख यांच्यासेाबत असे.

Dadasaheb Khindkar-Walmik Karad News
Beed News : देशमुख खुन खटला बीड न्यायालयातच चालणार! सीआयडीचा अर्ज न्यायालयाकडून मंजूर

दरम्यान, आता वाल्मीक व खिंडकर एकाच कारागृहात असल्याने खिंडकरच्या जिवीताला वाल्मीक कराडपासून धोका असल्याची भीती त्याच्या पत्नीला आहे. पतीच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन, कायमस्वरूपी पोलीस गार्डचे संरक्षण द्यावे, तसेच इतर बरॅकमध्ये त्याला हलवावे, व सिसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवावे, अशी मागणी अश्‍विनी खिंडकर यांनी कारागृह अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Dadasaheb Khindkar-Walmik Karad News
Santosh Deshmukh Case : ...तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचीही चौकशी करणार; CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य

बीड जिल्ह्यात धनंजय देशमुखांच्या साडूचा म्हणजेच दादासाहेब खिंडकर याचा एक जूना व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला होता. यात खिंडकर एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जूना असून तो वाद कधीच मिटल्याचा दावा खिंडकर याने केला होता. मात्र दादासाहेब खिंडकर याच्यावर घरफोडी, पैसे उकळून फसवणूक प्रकरणात गंभीर गुन्हे नोंद आहेत. बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा सरपंच असलेल्या दादासाहेब खिंडकर याच्या ताब्यात गेल्या दहा वर्षापासून ही ग्रामपंचायत असल्याचे बोलले जाते.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com