Beed News : देशमुख खुन खटला बीड न्यायालयातच चालणार! सीआयडीचा अर्ज न्यायालयाकडून मंजूर

The murder case of Sarpanch Santosh Deshmukh will now be heard in Beed Court. Stay updated with the latest developments in this high-profile case. : सुनावणीसाठी बीडहून आरोपींची केजला ने-आण करणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठीण आहे. तसेच, साक्षीदारही केज भागातील असल्याने त्यांची गुप्तता व त्यांची साक्ष नोंदविताना त्यांच्यावरील स्थानिक दबाव येऊ शकतो.
Santosh Deshmukh News Beed
Santosh Deshmukh News Beedsarkarnama
Published on
Updated on

Court News : सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन खटल्याची सुनावणी बीडच्या न्यायालयाच होणार आहे. सरकारी पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाने केलेली मागणी मान्य केली. आज बुधवारी (ता. 19) न्यायालयाने हा निकाल दिला. नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली.

त्यानंतर 11 डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा गुन्हा नोंद झाला. (Beed News) तर, याच प्रकल्पावर सहा डिसेंबरला दलित सुरक्षा रक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हाही नोंद झाला. केज पोलिस ठाण्यात दाखल तीनही गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पथकाने केला.

26 फेब्रुवारीला या गुन्ह्यांच्या तपासाचे दोषारोपपत्र येथील विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर दोषारोपपत्र केज येथील अतिरिक्त न्यायालयात वर्ग करण्यात आले. (Crime) केजचे जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) सुधीर भाजीपाले यांच्यासमोर या प्रकरणाची पहिली सुनावणी 11 मार्चला झाली. पुढील सुनावणी 26 मार्चला होणार होती. मात्र, आता न्यायालयाने हा खटला बीडच्या न्यायालयात चालविण्याबाबतची गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी मान्य केली आहे.

Santosh Deshmukh News Beed
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी अपडेट; अवादा कंपनीच्या तीन वॉचमनने जबाबात केला 'हा' मोठा दावा

दरम्यान, सुनावणीसाठी बीडहून आरोपींची केजला ने -आण करणे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठीण आहे. तसेच, साक्षीदारही केज भागातील असल्याने त्यांची गुप्तता व त्यांची साक्ष नोंदविताना त्यांच्यावरील स्थानिक दबाव येऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी बीडच्या न्यायालयात व्हावी, असा अर्ज सीआयडीच्या वतीने जिल्हा न्यायालयात केला होता. या अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद मंगळवारी (ता. 18) पूर्ण झाल्यानंतर बुधवारी याबाबत न्यायालयाने निकाल दिला.

Santosh Deshmukh News Beed
Santosh Deshmukh Case : '...तर नक्कीच त्याच्याकडे पुरावे असणार', धनंजय देशमुखांचा दावा

दरम्यान, दिड हजार पानांच्या दोषारोपपत्रात खंडणीला अडसर ठरल्याने संतोष देशमुख यांचा खुन झाल्याचा ठपका ठेवत वाल्मीक कराड या खुनाचा सुत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे व फरार कृष्णा आंधळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. खंडणीला अडसर ठरल्यानेच कट रचून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दोषारोपत्रात नमूद करण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनवणेचे नाव दोषारोपत्रातून वगळण्यात आले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com