
Nanded : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत अनेक अपेक्षा आहेत. (Ashok Chavan On Vande Bharat Train) वर्षानुवर्षे रखडेलेले रेल्वे विद्युतीककरण, दुहेरी मार्गाच्या कामांना आता कुठे वेग आला आहे. एवढेच नाही तर देशभरात सध्या चर्चेत असलेली वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे नांदेड-मुंबई मार्गावल सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच रावसाहेब दानवे यांनी नुकतेच केले होते.
याबद्दल माजीमंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दानवे यांचे स्वागत केले आहे. रेल्वे विकासाबाबतीत मराठवाड्याला आपल्याकडून खूप अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. या संदर्भात चव्हाण यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी (Marathwada) मराठवाड्यातील रेल्वे विकासासंदर्भात काही मागण्या देखील केल्या आहेत.
चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Dnave) यांनी केलेले सुतोवाच स्वागतार्ह आहे. रेल्वे विकासाबाबत मराठवाड्याला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.
समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विस्तारित प्रकल्प म्हणून जालना-नांदेड नवीन महामार्गाशेजारी बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारण्याची आमची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते. रावसाहेब दानवे यांनी याविषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.