Danve-Sattar News : दानवेंसोबत जेवणाच्या टेबलावर सत्तारांकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग ?

Marathwada : दानवे यांना आपली कन्या संजना जाधव यांना कन्नडमधून आमदार करण्यासाठी सत्तार यांची मोठी मदत होवू शकते.
Danve-Sattar News, Aurangabad
Danve-Sattar News, AurangabadSarkarnama

Marathwada Political : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पडद्यामागील मैत्री सर्वश्रुत आहे. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सलग तीनवेळा विजयी झाले आहेत. ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना छुपी रसद पुरवली जाते हे उघड गुपीत आहे. आता हीच परंपरा पुढे कायम सुरू राहावी आणि मुलाला आमदार करता यावे यासाठी सत्तारांचे प्रयत्न सुरू आहेत.

Danve-Sattar News, Aurangabad
Sattar-Danve News : कृषी महोत्सवाच्या निमंत्रणासाठी भेटले, सत्तारांकडून रेल्वेसाठी साकडे..

राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे (Marathwada) आमंत्रण देण्यासाठी गेलेल्या सत्तार पिता-पुत्राचा रावसाहेब दानवे यांनी यथेच्छ पाहुणाचारही केला. विरोधी पक्षात असतांना देखील सत्तार यांचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासोबत औरंगाबादच्या बंगल्यात केलेले भोजन चांगलेच चर्चेत आले होते. आता तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार एकत्र आहे, त्यामुळे दानवे-सत्तार यांचे एकत्रित भोजन फारसे चर्चेत आले नाही.

पण याच जेवणाच्या टेबलावर सत्तार यांनी आपले पुत्र समीर यांच्या आमदारकीसाठी दानवेंना गळ तर घातली नाही ना? अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा वावर हा फक्त मतदारसंघापुरता नाही, तर राज्यात आणि विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यात आहे. कन्नड, वैजापूर, फुलंब्री, गंगापूर-खुल्ताबाद या सगळ्या मतदारसंघात सत्तार यांनी आपले समर्थक निर्माण केलेले आहेत. त्यामुळे दानवे यांना आपली कन्या संजना जाधव यांना कन्नडमधून आमदार करण्यासाठी सत्तार यांची मोठी मदत होवू शकते.

तर सिल्लोड-सोयगांवमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मैत्रीच्या परंपरेमुळे समीर सत्तार यांच्या आमदरकीचा प्रवास सुकर होवू शकतो. त्यामुळे राज्यातील या दोन नेत्यांचे एकत्रित टेबलावर येवून जेवण करणे ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासाठी निश्चितच नाही.

निमित्त जरी कृषी महोत्सवाच्या निमंत्रणाचे असले तरी दानवे-सत्तार यांची भेट आणि एकत्रित जेवणातून भविष्यातील अनेक राजकीय घडामोडीची दिशा ठरली असणार एवढे मात्र निश्चित. दानवे, सत्तार, समीर यांच्यासोबत दानवे यांची नात देखील यावेळी सोबत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com