
Marathwada : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी जावून भेट घेतली. निमित्त होते सिल्लोडमध्ये होत असलेल्या (Agriculture Festival) राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे. सत्तार यांनी स्वतः दानवे यांची भेट घेऊन त्यांना कृषी महोत्सवाला उपस्थितीत राहण्याची विनंती केली.
मराठवाड्यात (Marathwada) पहिल्यांदाज राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन होत असल्याने जिल्ह्याचे खासदार म्हणून सत्तार (Abdul Sattar) यांनी दानवे यांना निमंत्रित केले. महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत सत्तारांनी रेल्वेसाठी देखील दानवेंना साकडे घातले. जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासह केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
यावेळी आमदार संतोष दानवे, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची उपस्थिती होती. जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करू असे सत्तार यांनी दानवेंना सांगितले. तर केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली.
मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पोखरा योजना टप्पा २ राबविण्यात येणार असून यात अनेक गावांचा समावेश करण्यात येणार आहे. यावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली. एकमेकांचे राजकीय विरोधक, पण समोरासमोर आले की एकमेकांची स्तुती करत समर्थकांना चकवा देतात.
या दोन्ही नेत्यांची भेट झाली की त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते. राजकीय व्यासपीठावर एकमेकांची पिसे काढतात पण निवडणुकीत मात्र शेजार धर्म पाळतात. त्यामुळे कृषीमंत्री सत्तार यांच्या पुढाकारातून होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे निमंत्रण द्यायला, सत्तार थेट दानवेंच्या घरी पोहचले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.