औरंगाबाद : राज्यातील काल झालेल्या तीन्ही दसरा मेळाव्याची चर्चा अजूनही थांबलेली नाही. मुंबईच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे, तर बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा हजारो, लाखोंच्या गर्दीत पार पडला. आता कुणाचे भाषण सरस, कुणाचे वाचून दाखवलेले यावर दोन्ही बाजूंनी खल आणि टीका सुरू आहे. तर तिसरा मेळावा होता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा.
बीड (Beed) जिल्ह्यातील सावरगावच्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची ही पररंपरा काल देखील त्याच जल्लोषात आणि प्रचंड गर्दीच्या उपस्थितीत पार पडली. (Marathwada) पंकजा यांचा मेळावा दुपारीच झाल्याने प्रसार माध्यमांनी मग आपला मोर्चा मुंबईतील मेळाव्यांकडे वळवला होता. जेव्हा कालच्या तिन्ही मेळाव्याची तुलना होऊ लागली आहे, तेव्हा पंकजा मुंडेच्या मेळाव्याने बाजी मारल्याचे बोलले जाते.
गर्दी आणि भाषणात देखील सावरगावचा मेळावा उजवा ठरला. पन्नास मिनिटांच्या आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी अनेक गोष्टीचा खुलासा करत आपली पुढील वाटचाल कशी असेल हे देखील स्पष्ट केले. त्यामुळे घरची भाकर-चटणीची शिदोरी घेऊन आलेले पंकजा मुंडे यांचे लाखो समर्थक समाधानी होऊन परतले.
आपल्याकडे मंत्रीपद, आमदारकी, खासदारकीच काय पण साधं ग्रामपंचायतीचं सदस्य पद नसतांना देखील तुम्ही इथे का आलात? असा प्रश्न पकंजा यांनी आपल्या भाषणातून उपस्थितीत केला होता? पंकजा मुंडे यांच्या प्रेमापोटी उन्हा-तान्हात चार ते पाच तास एकाच ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी बसलेली ही गर्दी पाहून पंकजा मुंडे देखील भारावून गेल्या होत्या. सभा संपल्यानंतर त्यांनी समर्थकांच्या या प्रतिसादाबद्दल कौतुक करत त्यांचे आभार देखील मानले.
पंकजा यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून त्या म्हणतात, गर्दी प्रचंड.. होती लोक माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते... यंत्रणांनी गर्दीचा अंदाज कमी आखला, पोलीस संख्येने कमी पडले.. युवक प्रचंड संख्येने होते उत्साह जबरदस्त होता. संख्या प्रचंड... उत्साह अफाट .. मैदान अपुरे पडले... पण प्रेम आणि आशिर्वाद यांनी भरून पावले. अशा शब्दात पकंजा यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले. पंकजा यांच्या या ट्विट्ची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.