Tanaji Sawant : अजितदादा अन् राणाजगजितसिंह पाटील तानाजी सावंतांवर नाराज?

Eknath Shinde : धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि तानाजी सावंत यांच्या पुढाकारानं महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, या कार्यक्रमाला अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गैरहजेरी लावल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
ajit pawar | ranaranjitsinh patil |tanaji sawant
ajit pawar | ranaranjitsinh patil |tanaji sawantsarkarnama
Published on
Updated on

विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यातील महायुती सरकारमध्ये सारं आलबंल नसल्याचे दिवसेंदिवस ठळक होत चालले आहे. शासनाच्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या उपस्थितीच्या जाहिरातीत नाव असतानाही अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. तर जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार राणाजगजितसिंह पाटील देखील न आल्याने महायुतीत काही अलबेल नाही, असे चित्र आहे.

दोन वेळा दौऱ्याची चर्चा होऊन न आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) महिला सक्षमीकरण अभियानाच्या निमित्ताने शनिवारी (ता. 14) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रमाची जय्यत तयारी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याच्या जाहिरात देण्यात आल्या होत्या.

मात्र, शनिवारी झालेल्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadnavis ) उपस्थित नव्हते. भाजपचे अध्यक्ष नड्डा हे मुंबईत असल्याने फडणवीस आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आले नाहीत. याला काही कारणे असावीत, असा अंदाज आहे. धाराशिव लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने लढवली. पण, 'आपल्याला उमेदवार मान्य नव्हता,' असे वक्तव्य असलेला मंत्री सावंत यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर आला होता. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले होते.

ajit pawar | ranaranjitsinh patil |tanaji sawant
VIDEO : तानाजी सावंतांमुळे अर्चनाताई पाटलांचा पराभव?

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ही निवडणूक भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी लढवली होती. मंत्री सावंत यांच्या वक्तव्यामुळेच दुखावलेले भाजपा आमदार पाटील आले नाहीत, असे म्हणायला जागा आहेच. मात्र, ते देखील मुंबईला असल्याचे काहींनी सांगून नाराजीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला.

"लोकसभेला आपल्याला उमेदवार मान्य नव्हता," असे सांगून मंत्री सावंत यांनी उपमुख्यमंत्री पवार व भाजपा आमदार पाटील यांची ओढावून घेतलेली नाराजीच त्यांच्या अनुपस्थितीचे कारण असल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी सुरु होती. मंत्री सावंत यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक साखर कारखाना सुरु आहे. तर जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक वर्ष पकड असणारे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उपमुख्यमंत्री पवार व आमदार राणाजगजितसिंह पाटील हे माजी आमदार राहूल मोटे यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

ajit pawar | ranaranjitsinh patil |tanaji sawant
Ranajagjitsinha Patil : राणा पाटलांनी कुणा-कुणाचा राजकीय काटा काढला? पवारसाहेबांच्या मोहऱ्यानं A टू Z सगळी नावेच सांगितली

लोकसभा निवडणुकीत परंडा मतदारसंघातून तब्बल 81 हजार मतधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळाले आहे. मागील विधानसभेच्या वेळी मंत्री सावंत यांच्यासोबत असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील उध्दव ठाकरे यांच्याकडे आहेत. लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य यातच अजित पवार व भाजपचे आमदार पाटील यांची सावंत यांनी ओढवून घेतलेली नाराजी विधानसभा निवडणूकीपूर्वी दूर होणार का? हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com