VIDEO : तानाजी सावंतांमुळे अर्चनाताई पाटलांचा पराभव?

Tanaji Sawant On Archana Patil : महायुतीत शिवसेनेचा पारंपारिक असलेला धाराशिव मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीला गेला होता. त्यामुळे तानाजी सावंत हे नाराज असल्याचं बोललं जात होते. यातच तानाजी सावंत यांचं एक विधान समोर आलं आहे.
archana patil tanaji sawant.jpg
archana patil tanaji sawant.jpgsarkarnama
Published on
Updated on

धाराशिव मतदारसंघात शिवसेनेचे ( ठाकरे गट ) ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) अर्चनाताई पाटील यांचा पराभव केला. येथून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लढण्यास इच्छुक होते.

मात्र, ऐनवेळी हा मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीला गेल्यानं महायुती म्हणून अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर होती. मात्र, तानाजी सावंत यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

"जनतेपर्यंत मतदान करा म्हणून सांगायला आलो नाही. कारण, मला पटलेलं नव्हतं," असं विधान तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी केलं आहे. तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या वक्तव्यानंतर तानाजी सावंत यांच्यामुळे अर्चनाताई पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला का? अशी चर्चा रंगली आहे.

archana patil tanaji sawant.jpg
VIDEO महायुतीत मिठाचा खडा; अजितदादांनी केली 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

तानाजी सावंत काय म्हणाले?

"ज्याला कधी आपण मतदान केलं नाही, त्यांच्याबद्दल कधी बोललो नाही. तुमच्यापर्यंत मतदान करा म्हणून सांगायला आलो नाही. कारण, आपल्यालाच पटलं नव्हतं," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर अर्चनाताई पाटील यांच्या पराभवास तेच कारणीभूत आहेत का? धनंजय सावंत यांना उमेदवारी न दिल्यानं तानाजी सावंत यांना अर्चनाताई पाटील यांचं काम केलं नाही का? अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

archana patil tanaji sawant.jpg
Mahayuti Politics: बेभान नेते, उथळ वक्तव्यांनी महायुतीचा वारू भरकटला?

तानाजी सावंत यांनी अजितदादांसमोर व्यक्त केली होती खदखद...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 19 एप्रिलला अर्चनाताई पाटील यांच्या प्रसारासाठी धाराशिव येथे आले होते. यावेळी तानाजी सावंत यांनी अजितदादांसमोरच नाराजी व्यक्त केली होती. तानाजी सावंत म्हणालेले, "महायुतीचा उमेदवार कोणीही असेना, पण धनंजय सावंत यांनी 26 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. धाराशिव हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीनं कडवट शिवसैनिकांचा आहे. तो कडवट बाणा शिवसैनिक कधीही सोडणार नाही. तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांनी हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला."

"अशाच पद्धतीनं शिवसैनिकांचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला, तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हा कधीही सहन करणार नाही. कारण, पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे. या ठिकाणाहून आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेला आहे. हा तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. पण, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपलं दु:ख विसरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पुढं जात अर्चनाताई पाटलांना लीड द्यायचं आहे," असं आवाहन तानाजी सावंतांनी केलं होतं.

ओमराजेंनी केला अर्चनाताईंचा पराभव

लोकसभा निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल तीन लाख 29 हजार 846 मतांनी पराभव केला आहे. ओमराजे निंबाळकर यांना सात लाख 48 हजार 752 तर अर्चना पाटील यांना चार लाख 18 हजार 906 इतकी मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com