Parli Politics : परळीत 'स्ट्राँग रूम'वरून राडा, आक्रमक दीपक देशमुख यांच्यासह 25 जणांवर गुन्हा

Deepak Deshmukh FIR : परळीतील स्टाँग रुम बाहेर झोपण्याची व्यवस्था करून द्यासाठी दीपक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Deepak Deshmukh
Deepak Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Deepak Deshmukh News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासूनच परळीतील नगरपालिकेची आणि तिथे घडणाऱ्या घडामोडींची चर्चा बीडसह राज्यभरात होताना दिसते आहे. निवडणुकी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांना पक्षात प्रवेश देत माजी मंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिल्याची चर्चा होती.

दरम्यान निवडणूक प्रचार आणि त्यानंतर झालेल्या मतदानाच्या वेळी परळीत ठिकठिकाणी मुंडे आणि देशमुख समर्थकांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. मतदान केंद्रांमधील सीसीटीव्ही फोडण्यात आले होते तर काही ठिकाणी त्यावर कपडा टाकण्यात आल्याचे प्रकार समोर आले.

नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लाभल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी स्ट्रॉंग रूम जवळ मुक्कामाची व्यवस्था करा, अशी मागणी करत दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बाळाचा वापरही करावा लागला. आता याच प्रकरणी पोलिसांनी दीपक देशमुख यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच बदनाम झालेल्या परळीत नगरपालिका निवडणुकीतील मतदानाच्या संशयावरून दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आल्या होत्या. दीपक देशमुख, राजाभाऊ फड यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर धनंजय मुंडे समर्थक आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना वारंवार सांगितले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असा आरोप करत राजाभाऊ फड, दीपक देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

दरम्यान निवडणूक आयोगाने काही नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करून त्या 20 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलून एकाच वेळी म्हणजे 21 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिला.त्यामुळे ईव्हीएम मशीन आता 21 डिसेंबरपर्यंत स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत.

Deepak Deshmukh
Municipal election postponement : पंधरा दिवसाचा लांब पल्ला, उमेदवारांना खर्चाची धास्ती; ऑनलाइन संपर्कात, प्रत्यक्षात ऑफलाइन!

परळीतील स्ट्रॉंग रूम मधील ईव्हीएम सुरक्षित नाहीत, आम्हाला पोलिसांवर भरोसा नाही आम्ही स्वतः स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये ईव्हीएमची सुरक्षा करू. आमच्या मुक्कामाची सोय करा,अशी खळबळजनक मागणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी प्रशासन, निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली होती. ही मागणी फेटाळण्यात आल्यानंतर दीपक देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट स्ट्राँग रूमच्या दिशेने धाव घेत निदर्शने करत आंदोलन केले होते.

त्यानंतर स्ट्रॉंग रूमच्या तळमजल्यावर दीपक देशमुख आणि काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना टीव्हीवर स्ट्रॉंग रूम समोरील पोलिस बंदोबस्त आणि सुरक्षा पाहण्याची व्यवस्था करून देण्यात आली. मात्र इथे आम्हाला झोपण्यासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याचे सांगत दीपक देशमुख यांनी पुन्हा व्यवस्था करण्याची मागणी केली.

पोलिसांच्या अंगावर धावून गेले...

स्ट्राँग रूम समोर आंदोलन करत पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी दीपक देशमुख यांच्यासह 25 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना दोन दिवसांपूर्वी सौम्य लाठीमार करावा लागला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या तक्रारीवरून दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजिनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे, महादेव गंगणे, मोहन मुंडे व इतर अशा एकूण 25 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Deepak Deshmukh
Municipal election postponement : पंधरा दिवसाचा लांब पल्ला, उमेदवारांना खर्चाची धास्ती; ऑनलाइन संपर्कात, प्रत्यक्षात ऑफलाइन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com