जमीनीच्या फेरफारात मदतीसाठी नायब तहसीलदाराने घेतली पंधरा हजारांची लाच

तक्रारदाराने २७ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदविली. दरम्यान, एसीबीने सापळा रचून टिपरसे यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले. (Anti Corruption bureau)
Anti Corruption Raid In Latur District

Anti Corruption Raid In Latur District

Sarkarnama

Published on
Updated on

लातूर : जमीनीवर बॅंकेचा बोजा असल्यामुळे फेरफारात अडचण येत होती, यात मदत करतो असे सांगत चाकूर येथील तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदाराने तक्रारदाराकडे १५ हजारांची लाच मागितली होती. (Latur) ही लाच स्वीकारतांना लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने नायब तहसिलदारास रंगेहाथ पकडले. (Marathwada) या कारवाईमुळे तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली. (Anti Corruption bureau)

जमीन मालक आणि बँकेमध्ये फेरफार करण्यावरून वाद होता. सदर जमीनीवर कर्ज असल्यामुळे बॅंकेना आपला बोजा चढवला होता. तसेच या जमीनीचा फेरफार घेण्यात येऊ नये, असा आक्षेप अर्ज देखील तहसिल कार्यालयाकडे केला होता.

फेरफार करण्यासाठी मदत करावी म्हणून तक्रारदाराने चाकूर येथील नायब तहसिलदारांची भेट घेतली होती. परंतु यासाठी संबंधितांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली.

यावरून चाकूर येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या जमिनीवर आई आणि बहिणीचे हिस्से वाटणी असून, सदर जमिनीवर पूर्वीचे बँकेचे कर्ज आहे.

<div class="paragraphs"><p>Anti Corruption Raid In Latur District</p></div>
'जेव्हा लढायची वेळ होती तेव्हा OBC लढले नाहीत'

सदर जमिनीवर बँकेचा बोजा असल्यामुळे या जमिनीच्या फेरफारास बँकेमार्फत लेखी अर्ज करून आक्षेप नोंदविण्यात आला होता. सदर आक्षेप अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन जमिनीच्या व्यवहारात मदत करण्यासाठी येथील नायब तहसीलदार शेषेराव शिवराम टिपरसे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने २७ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदविली. दरम्यान, एसीबीने सापळा रचून टिपरसे यांना १५ हजारांची लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com