Maharashtra Congress : `त्या` आमदारांवर कारवाई करण्यास काँग्रेस धजावेना..

Vidhan Parishad Cross Voting12 जुलै रोजी महाराष्ट्रातील विधान परिषदेतील 11 उमेदवारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सात उमेदवारांनी पक्षाचा आदेश झुगारत महायुतीच्या उमेदवाराना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
jitesh antapurkar nana patole mohan hambarde
jitesh antapurkar nana patole mohan hambardesarkarnama
Published on
Updated on

Congress Political News : विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून क्राॅस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या सात आमदारांवर अद्याप कारवाई झालेली नाही. मराठवाडा, मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या या आमदारांची यादी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिल्लीत हायकमांडकडे पुढील कारवाईसाठी पाठवली होती. परंतु बारा दिवस उलटून गेल्यानंतरही या सात आमदारांवर कुठलीच कारवाई झालेली नाही.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या आमदारांवर कारवाई करण्यास (Congress) काँग्रेसचे वरिष्ठ नेते धजावत नाहीयेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 12 जुलै रोजी महाराष्ट्रातील विधान परिषदेतील 11 उमेदवारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.

विशेषतः काँग्रेसच्या सात उमेदवारांनी पक्षाचा आदेश झुगारत महायुतीच्या उमेदवाराना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सर्वप्रथम काही आमदारांची नावे राज्यातील प्रमुख नेत्याना सांगत क्राॅस व्होटिंग झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पुरावे आणि खात्री पटल्यानंतर गद्दारी केलेल्या या आमदारांची नावासह यादी तयार करुन ती दिल्लीला हायकमांडकडे कारवाईसाठी पाठवण्यात आली होती.

jitesh antapurkar nana patole mohan hambarde
विधानपरिषद निवडणुकीत तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले; मिटकरींचा धक्कादायक दावा

विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कुठल्याही परिस्थितीत गद्दारी करणाऱ्या आमदारांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. या संदर्भात 19 जुलै रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार होती. मात्र विधान परिषदेसाठी मतदान होऊन दोन आठवडे होत आले तरी काँग्रेसकडून कुठलीच पावले उचलली गेली नाहीत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासह काही नेत्यांची भेट घेतली होती. भाजपचे खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांनी काँग्रेसच्या कारवाईची खिल्ली उडवतांना कसली कारवाई, ते सगळे आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा दावा केला होता.

jitesh antapurkar nana patole mohan hambarde
Congress MLA Cross Voting : 'क्रॉस व्होटिंग' करणाऱ्या 'या' पाच आमदारांवर कुऱ्हाड पडणारच; खर्गेंचे आदेश

आगामी विधानसभा निवडणुका पाहता काँग्रेस हायकमांड `त्या` सात आमदारांच्या बाबत मवाळ झाले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकाचवेळी सात आमदारांवर कारवाई केल्यास त्याचा पक्षावर काय परिणाम होईल? याची चाचपणी देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जात असल्याचे बोलले जाते.

विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीत काँग्रेसचे आमदार फुटल्याचे उघड झाल्यानंतर ज्या वेगाने राज्यातील नेत्यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते, पण दोन आठवड्यानंतर यावर आता चर्चाही होताना दिसत नाहीयेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत वीस आमदार फोडले, पण त्यांना कळाले सुद्धा नाही, असा टोला लगावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com