देवस्थान जमिन घोटाळा : वक्फ बोर्डाने फटाके फोडले; महसूलचा बॉम्ब कधी फुटणार?

(Waqf board property) वक्फ बोर्डाने धाडस करत आष्टी तालुक्यातील चिंचपूर व रुई नालकोल येथील दोन गुन्ह्यानंतर मंगळवारी देवी निमगाव येथील जमिन प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत.
Wakf Borad
Wakf Borad Sarkarnama

बीड : जिल्ह्यातील देवस्थान व प्रार्थनास्थळांच्या हजारो एकर जमिनींची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वक्फ बोर्डाने आष्टी तालुक्यात तीन गुन्हे नोंद करुन दिवाळीच्या तोंडावर फटाके फोडले आहेत. पण, महसूलच्या अखत्यारित येणाऱ्या हजारो एकर जमिनींच्या अफरातफरी बद्दल गुन्ह्यांचा बॉम्ब कधी फुटणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानच्या मदतमास आणि खिदमतमास जमिनींच्या कागदपत्रांवर बनावट आदेशाने परस्पर नावे लावण्यात आल्याचा प्रकार समो आला आहे. या प्रकरणात तत्कालिन भूसाधार अधिकारी व सध्या बडतर्फ असलेला उपजिल्हाधिकारी डॉ. नरहरी शेळके ह्याच्यासह तत्कालिन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील हे प्रशासनातील सुत्रधार समोर आले आहेत.

मात्र, शेकडो तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधीत तहसिलदार देखील अशा प्रकरणांमध्ये समाविष्ट आहेत. याचे लाभार्थी राजकीय पक्षांशी संबंधीत असल्याने राजकीय पक्षांनी या विषयावर मिठाची गुळणी धरली आहे. पण, वक्फ बोर्डाने मात्र धाडस करत आष्टी तालुक्यातील चिंचपूर व रुई नालकोल येथील दोन गुन्ह्यानंतर मंगळवारी देवी निमगाव येथील जमिन प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत.

या गुन्ह्यांत वरिल दोन अधिकाऱ्यांची नावे आली आहेत. चिंचपूर प्रकरणात पंधरा आरोपी होते. तर रुई नालकोल येथील शेख महंमदबाबा देवस्थानच्या जमिनीची हेराफेरी केल्या प्रकरणात सहा आरोपी होते. देवी निमगाव प्रकरणात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्यांचे हे फटाके वक्फ बोर्डाने फोडले आहेत.

मात्र, बीडमधील शहेंनशहावली दर्गा, माजलगाव तालुक्यातील पात्रुड, गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील शहेनशाहवली दर्गाची जमिन, नामलगाव येथील गणपती देवस्थानची जमिन, तळेगाव (परळी तालुका) येथील जमिन, बेलखंडी (पाटोदा) येथील गोसावी मठाची जमीन, शेपवाडी(ता अंबेजोगाई) येथील जमीन, धारूर तालुक्यातील बालाजी मंदीर देवस्थानची जमिन अशा हजारो एकर जमिनींची हेराफेरी झाली आहे. मात्र, या गुन्ह्यांचा बॉम्ब महसूल विभाग कधी फोडणार? का, असाच दडवून ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Wakf Borad
मोदी म्हणाले, शंभर टक्के लसीकरण करा; नागरिकांमध्ये विश्वास वाढवा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com