Dhananjay Deshmukh Election : पराभवाचे नेमके कारण काय? धनंजय देशमुखांनी मांडली मनातील खंत, 'या' गोष्टी ठरल्या अपयशाचे कारण

dhananjay deshmukh reaction on defeat : धनंजय देशमुखांनी त्यांच्या पराभवामागील नेमकी कारणे मांडली. रणनीतीतील चुका, स्थानिक मुद्दे आणि मतदारांचा कल याचा सविस्तर आढावा.
Dhananjay Deshmukh Election : पराभवाचे नेमके कारण काय? धनंजय देशमुखांनी मांडली मनातील खंत, 'या' गोष्टी ठरल्या अपयशाचे कारण
Published on
Updated on

Beed Politics News : मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख विजयी झाले आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा. दिवगंत संतोषअण्णा देशमुख यांना अपेक्षित काम, त्यांचे व्हिजन घेऊन ते पुढे जाणार आहेत, त्यामुळे आम्ही गावाच्या विकासासाठी कायम त्यांना मदत करू, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर दिली.

संतोष देशमुख असताना गावकऱ्यांशी जे कॉम्बिनेशन, संबंध होते ते पुढे नीट राहिले नाही, अशी कबुली देशमुख यांनी दिली. संतोष अण्णांना न्याय मिळवून देण्यासाठी मला, कुटुंबाला आणि सगळ्या गावाला रस्त्यावर उतरावं लागलं.

Dhananjay Deshmukh Election : पराभवाचे नेमके कारण काय? धनंजय देशमुखांनी मांडली मनातील खंत, 'या' गोष्टी ठरल्या अपयशाचे कारण
Sanjay Raut : ठाकरेंच्या विधानसभेच्या उमेदवारी बाबत राऊतांचा मोठा खुलासा, अधिकृत घोषणा न करता थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावर....

प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती मला किंवा मी त्यांना वेळ देऊ शकत नाही. न्यायासाठी मला दिल्लीपर्यंत धाव घेण्याची वेळ आली आहे. भविष्यातही हा लढा द्यावाच लागणार आहे. या सगळ्या धावपळीत मला गावकऱ्यांना वेळ देणं झालं नाही, हे ही आमच्या पराभवाचे कारण असू शकेल, असे देशमुख यांनी सांगीतले.

निवडणूक झाली, गावकऱ्यांनी आपला निकाल दिला आहे, त्यामुळे आता आमचा राजकीय वाद संपला आहे. आता आम्ही पुढे जाणार आहोत. गावच्या विकासाठी आम्ही नवनिर्वाचित सरपंचांना मदत करायला तयार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

सरपंच पदाच्या काल झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांच्यावर 92 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. हा निकाल धक्कादायक असल्याचे बोलले जाते. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर अश्विनी देशमुख, धनंजय देशमुख व संपूर्ण कुटुंबाबद्दल मोठी सहानुभूती होती.

Dhananjay Deshmukh Election : पराभवाचे नेमके कारण काय? धनंजय देशमुखांनी मांडली मनातील खंत, 'या' गोष्टी ठरल्या अपयशाचे कारण
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना मोठा झटका! 'भोंदू बाबा' प्रकरणानंतर आता निवडणुकीत सख्ख्या भावाचा पराभव

या जोरावर अश्विनी देशमुख निवडून येतील असा अंदाज होता. बिनविरोध निवडणूकीचा प्रयत्न फसल्यानंतर स्वरुपानंद आणि अश्विनी देशमुख यांच्यात थेट लढत झाली. गावकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसाठीचा न्यायालयीन लढा आणि राजकारण या दोन्ही गोष्टी स्वतंत्र असल्याचे या निकालातून दाखवून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com