

Pune News : सध्या राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीचे रणधुमाळी पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपने धक्का तंत्राचा वापर करत सहा नावांची घोषणा केली असताना दुसरीकडे अद्याप महाविकास आघाडी कडून देण्यात येणाऱ्या एका उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं बोललं जात असलं तरी त्याबाबत अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करताना भाजपने यंदाही धक्कातंत्र अवलंबले आहे.
पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेश पातळीवर मेहनत करणाऱ्या माधवी नाईक, अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांची नावे सर्वत्र अपेक्षित होती. तसेच विदर्भातून नागपूरचे संजय भेंडे, कोकणातून सिंधुदुर्गचे प्रमोद जठार आणि प्रदेश पातळीवर सक्रिय असलेले सुनील कर्जतकर यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणारी याबाबत निश्चित असताना पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा मिळून एक उमेदवार असणार आहे. बाकीच्या पक्षांनी याद्या जाहीर केल्या असल्या तरी आमचा एकच उमेदवार असल्याने उद्या सकाळी 11 वाजता याबाबत सगळ्यांना कळेल.
विधान भवनाच्या पायरीवर उद्या अकरा वाजता उमेदवार कोण असेल याबाबत खुलासा होणार आहे. उद्या तुम्हाला अकरा वाजता उमेदवार पायऱ्या चढताना दिसेल त्यानंतर खरा उमेदवार कोण असेल याबाबत तुम्हाला खुलासा होईल असं संजय राऊत म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधे मंडळात जावे अशी माझी इच्छा आहे. मी पहिला माणूस आहे ज्याने सांगितलं की त्यांनी विधिमंडळात त्यांनी जायला हवे. त्यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, केसी वेणुगोपाल यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे अशी भूमिका मांडली आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.