Dhananjay Munde: अजितदादांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक; वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

Dhananjay Munde Birthday, Social Service Appeal, Maharashtra Politics: धनंजय मुंडे यांनी वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना मदत, शेतकऱ्यांना आधार आणि गरजूंना सहकार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला.
Dhananjay Munde paying last respects to late Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati, expressing deep grief and honoring the leader who shaped his political journey.
Dhananjay Munde appeals to supporters to mark his birthday through social service activities instead of celebrations.Sarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde Birthday: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवगंत नेते अजित पवार आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संबंध, मैत्री कायम चर्चेत राहिली. बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. विकासाची ओढ आणि प्रशासनावर प्रचंड पकड असलेला नेता गमावल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले. अजूनही अजित पवारांच्या आठवणीने अनेकांचे मन हेलावते. अशातच रात्रंदिवस त्यांच्यासोबत सावली सारखे वावरणारे धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. परंतु अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी, डोंगरा एवढे दुःख समोर असताना कुठलाही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

आमचा आधारवड गेला, वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही, अशी भावना व्यक्त करतानाच त्यांनी आपल्या समर्थकांना विविध सामाजिक उपक्रम राबवून तो साजरा करण्याचे आवाहन केले आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार आणि परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेला विनम्र आवाहन आहे, जीवनात काही क्षण असे असतात की, ते कोणताही उत्सव साजरा करण्यापेक्षा संवेदना आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात.

Dhananjay Munde paying last respects to late Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati, expressing deep grief and honoring the leader who shaped his political journey.
Aditya Thackeray: ठाकरेंच्या खासदाराच्या मनात नेमकं काय? ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु असतानाच संजय जाधव यांचा आदित्य ठाकरेंना खास मेसेज

दिवंगत उपमुख्यमंत्री, अजित पवार यांच्या अकाली निधनाने आपण सर्वजण अत्यंत दुःखी आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेसाठी अखंड झटणारा, विकासाला दिशा देणारा एक मोठा आधारवड आपण गमावला आहे. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन करत असताना कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. याचवेळी आपल्या परळी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परिसरात अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेच्या छायेत आहेत.

पावसाच्या प्रत्येक सरीकडे आशेने पाहणारा शेतकरी आजही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अशा वेदनादायी परिस्थितीत माझा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचा विचारही मनाला शिवत नाही. म्हणूनच १५ जुलै, माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका किंवा उत्सवी कार्यक्रम आयोजित करू नयेत, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.

वाढदिवस साजरा करण्याऐवजी माझ्यावरील आपल्या प्रेमाचे रूप समाजसेवेत दिसू द्या, एक तरी वृक्ष दत्तक घ्या आणि त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारा. आपल्या गावातील किंवा प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावा. अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे रहा. वाचनालयांना पुस्तके भेट द्या, कारण ज्ञानदान हीच सर्वात मोठी सेवा आहे. एखाद्या गरजू कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न करा.

Dhananjay Munde paying last respects to late Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati, expressing deep grief and honoring the leader who shaped his political journey.
Ajit Pawar NCP: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा 'वादा', धनंजय मुंडेंचं नशीब पलटणार, मंत्रिमंडळातील 'कमबॅक' ठरलं..? 'हे' मुद्दे ठरू शकतात अडथळा

माझ्यासाठी वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा दिवस नाही, तर समाजाचे ऋण फेडण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. तुम्ही केलेला प्रत्येक समाजोपयोगी उपक्रम, प्रत्येक मदतीचा हात आणि प्रत्येक सेवाभावाचे कार्य हीच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान भेट असेल. समाजसेवेच्या माध्यमातून दिवंगत अजितदादांना खरी आदरांजली अर्पण करूया, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com