अहमदपूर : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता. १४ ) संवाद दौऱ्यानिमित्त मतदारांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, प्रचारासाठी जाताना त्यांची सुनेगाव सांगवीत योगायोगाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली.
यानिमित्त दोघांनी निवडणुकीबाबत चर्चा केली. संवाद दौऱ्यानिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी गुगदळ, हगदळ, वरवंटी, शिंदगी खुर्द, वरवंटी तांडा, रुई तांडा, रुई दक्षिण, रुद्धा, सुनेगाव सांगवी, काळेगाव, शेणकुड, टाकळगाव सुनेगाव शेंद्री, सुमठाणा, वंजारवाडी, धसवाडी येथे बैठका व सायंकाळी खंडाळी येथे जाहीर सभा घेतली.
संवाद दौऱ्यामध्ये आमदार पाटील सुनेगाव गावकडे जात होते. याचवेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे परळीहून लोह्याकडे जात होते. तेव्हा त्यांची भेट झाली. दोघांमध्ये मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.
आमदार बाबासाहेब पाटील यांना जनतेची साथ मिळेल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, आमदार पाटील म्हणाले, की विकास कामावर निवडणूक लढवीत आहे. मतदार संघातील शिल्लक राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मतदारांनी पाठबळ द्यावे. मतदारसंघात अडीच हजार कोटी रुपयांचे विकासकामे केली. यामध्ये प्रामुख्याने सिंचनाचा मोठा भाग आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती उभारल्या. रस्त्याची रुंदीकरण व मजबुतीकरण केले. किनगाव येथे ग्रामीण रुग्णालय तर खंडाळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणत आरोग्याचा मोठा प्रश्न मिटवला आहे. अहमदपूरला उपजिल्हा रुग्णालय करून तालुक्यातील प्रत्येक खेडेगावातील रुग्णांच्या सोयी येथे करणार आहे. बचत गट माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार देऊन आर्थिक सक्षम बनवणार आहे. मतदारसंघात दर्जेदार शिक्षणाची सोय करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, अशोकराव केंद्रे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव खांडेकर, विशंभरराव पाटील, मुजीब पटेल जहागीरदार, तानाजी राजे, माधव नागमोडे, डॉ.फुजैल जहागीरदार, राम नरवटे, सूर्यकांत चिघळे, ॲड.मुजमिल हाश्मी, अय्याज शेख, बाबू रुईकर, गैबीसाब हाळणीकर, भैया सय्यद, हसन पैलवान, इलियास सय्यद, जमीर सौदागर, श्याम भगत, विकास बोबडे, बापू कज्जेवाड, चंद्रकांत गंगथडे, अजीज काझी, हुसेन शेख, एजाज मुंजेवार, एम.डी.इरफान, युवराज बदने, अनंत होळकर यांची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.