Dhananjay Munde : भरत कराडच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत अन् एका सदस्याला नोकरी द्या! धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

MLA Dhananjay Munde Write Letter To CM Fadnavis :आरक्षणाच्या प्रश्नावर कुणीही आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Dhananjay Munde Write Letter To Devendra Fadnavis
Dhananjay Munde Write Letter To Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on
Summary

1.धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भरत कराड यांच्या कुटुंबाला आर्थक मदतीची मागणी केली.

2. २५ लाख मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी.

3. ओबीसी आरक्षण संपल्याच्या भितीतून भरत कराड याने उचलले होते टोकाचे पाऊल.

Beed Political News : रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसींचे आरक्षण संपले या भीतीतून दोन दिवसापूर्वी आपले जीवन संपवले. या घटनेने मराठवाड्यात एकच खळबळ उडाली. आधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी आत्महत्या केल्या तर आता ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या भावनेतून या समाजाचे तरुण टोकाचे पाऊल उचलत आहेत.

भरत कराड याने आपले जीवन संपवल्यानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी वांगदरी गावात जाऊन कराड कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे देखील त्यांच्यासोबत होते. कुटुंबाला दिलेल्या आश्वासनानुसार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भरत कराड यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचे नैराश्य मनात बाळगून आत्महत्या केलेल्या भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मदत करावी. 25 लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार नोकरी मिळवून द्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनाही या संदर्भात पत्र पाठवण्यात आले.

Dhananjay Munde Write Letter To Devendra Fadnavis
Dhananjay Munde News : मराठा आरक्षणासाठी बलिदान, नितीन चव्हाण यांच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंकडून मदतीचा हात!

भरत कराड यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या बलिदानाने उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला राज्य सरकार न्याय देईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या नैराश्यातून भरत कराड या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

Dhananjay Munde Write Letter To Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Policies: आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी टाळले, ते धाडस देवेंद्र फडणवीस यांनी केले... काय आहे विषय?

भरत कराड यांच्या टोकाच्या निर्णयाने उघड्यावर पडलेल्या त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदतही केली. आरक्षण प्रश्नी सरकार सजग असून, कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून लढा लढला जाईल, मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर कुणीही आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले होते.

भरत कराड यांच्या कुटुंबीयांना पुढे कोणतीही मदत लागल्यास आम्ही तत्पर राहू, तसेच शासनाकडून देखील कराड कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

FAQ

1. धनंजय मुंडे यांनी भरत कराड यांच्या कुटुंबासाठी काय मागणी केली?
त्यांनी २५ लाखांची मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरीची मागणी केली.

2. मुंडे यांनी कराड कुटुंबाबाबत कोणाला पत्र लिहिले?
त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.

3. मुंडेंचे पत्र महत्त्वाचे का ठरते?
कारण यात राजकीय हस्तक्षेप व कराड प्रकरणात मदतीची मागणी अधोरेखित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com