Suresh Dhas News : मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत रीघ; आमदार कुचे, क्षीरसागर, धस यांनी घेतली भेट!

Suresh Dhas Met Manoj Jarange Patil : वाल्मीक कराडचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध पाहता त्यांना मंत्रीपदावरून हाकला, अशी मागणी सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.
MLA Suresh Dhas Met Manoj Jarange Patil At Antarwali News
MLA Suresh Dhas Met Manoj Jarange Patil At Antarwali NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. धनंजय मुंडेंवरील हत्येच्या कटाच्या आरोपानंतर अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी झाली.

  2. आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि नारायण कुचे यांनी जरांगे पाटील यांची खास भेट घेऊन राजकीय चर्चा केली.

  3. या भेटींमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात नवा तणाव निर्माण झाला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

Marathwada Politics : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचून त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी अटकेतील आरोपी, मनोज जरांगे पाटील आणि माझी नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची मागणी केली होती. या आरोप आणि प्रत्यारोपानंतर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील तणाव अधिकच वाढला.

मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्यानंतर कालपासून अंतरवाली सराटीत जरांगे यांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांची रीघ लागली आहे. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला. त्याला उत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळले. त्यानंतर लगेच जालन्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी अंतरवाली सराटीत धाव घेत जरांगे पाटील यांची भेट घेतली.

जरांगे पाटील यांनी केलेले आरोप गंभीर आहेत त्यांनी ज्या नेत्याचे नाव घेतले आहे ते मी घेणे योग्य नाही. यासंदर्भात पोलीस तपासात 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईलच. मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या हत्येचा कट जर कोणी रचत असेल तर ही गंभीर बाब आहे. यातील दोषींवर पोलीस तपासानंतर कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत. तसेच धमकी आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर जरांगे पाटील यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासंदर्भात आपण पोलीस अधीक्षकांशी बोललो आहोत, असे कुचे यांनी म्हटले होते.

MLA Suresh Dhas Met Manoj Jarange Patil At Antarwali News
Manoj Jarange on Dhananjay Munde : मनोज जरांगेंनी टाकला 'ऑडिओ क्लिप बॉम्ब'; दीड-दोन कोटी, धनंजय मुंडे अन्...

सुरेश धस यांनीही घेतली भेट

दरम्यान भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही अंतरवालीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आपल्या हत्येचा कट कसा रचला गेला? त्यात कोण कोण सहभागी होते? याची सविस्तर माहिती आणि चर्चा जरांगे यांनी सुरेश धस यांच्यासोबत केली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात न्याय सभा घेतल्या.

MLA Suresh Dhas Met Manoj Jarange Patil At Antarwali News
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले; ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्टला तयार!

देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध पाहता त्यांना मंत्रीपदावरून हाकला, अशी मागणी सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. वाढत्या दबावानंतरच मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता. काल मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनीच रचल्याचा जाहीर आरोप केल्यानंतर धस यांनी तातडीने मनोज जरांगे यांची अंतरवालीत येऊन भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. एकूणच बीड जिल्ह्यातील राजकारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे विरोधक पुन्हा एकदा अंतरवालीत दिसू लागले आहेत.

FAQs

1. धनंजय मुंडेंविरुद्ध कोणते आरोप झाले आहेत?
➡️ त्यांच्यावर हत्येच्या कटाचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे राज्यात राजकीय वादंग निर्माण झाला आहे.

2. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीस कोण-कोण नेते गेले?
➡️ आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि नारायण कुचे यांनी अंतरवलीत भेट घेतली.

3. या भेटीचा हेतू काय होता?
➡️ या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं.

4. बीड जिल्ह्यांत या प्रकरणाचा परिणाम काय झाला?
➡️ स्थानिक राजकारणात तणाव वाढला आहे.

5. मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीबाबत काही प्रतिक्रिया दिली का?
➡️ त्यांनी सध्या कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com