Karuna Munde News : गोपीनाथ मुंडेंचे खरे वारस धनंजय मुंडेच,'करूणा' शर्मांकडून नवऱ्याच्या संघर्षाचेही कौतुक!

OBC V/s Maratha : ओबीसी मेळावा आणि त्यातील धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करूणा मुंडे यांच्यातील संघर्ष चिघळला होता. विशेषतः करूणा मुंडे अधिक आक्रमक झाल्या होत्या.
Karuna Munde On Dhananjay Munde News
Karuna Munde On Dhananjay Munde Newssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेचं अनपेक्षित कौतुक करत, “गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस धनंजयच आहेत” असं विधान केलं.

  2. या वक्तव्यामुळे मुंडे कुटुंबात आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  3. धनंजय मुंडेंच्या समर्थकांमध्ये आनंद तर विरोधकांमध्ये हलकल्लोळ निर्माण झाला आहे.

Marathwada Politics : धनंजय मुंडे यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात वादळ निर्माण करणाऱ्या त्यांच्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी आज चक्क नवऱ्याचे कौतुक केले. वारसा पोटातून नाही, तर विचारातून जन्माला येतो, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडे हेच आहेत, अशा शब्दात करूणा मुंडे यांनी भुजबळांच्या विधानाचे समर्थन केले. गोपीनाथ मुंडे यांनी जसे जनतेत जाऊन आपले स्थान निर्माण केले, तसेच धनंजय मुंडे यांनीही केले, असे गौरवोद्दगारही करूणा मुंडे यांनी काढले.

बीड येथे झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहेत. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी काम करावे, असे म्हटले होते. यावरून राजकीय वर्तुळाच चर्चा सूरु असतानाच धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून अंगावर आले तर शिंगावर घ्या, असे आव्हान आपल्या भाषणातून केले होते. यावर करूणा मुंडे यांनी हिंमत असेल तर मला शिंगावर घ्या, असे चॅलेंज दिले होते.

ओबीसी मेळावा आणि त्यातील धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करूणा मुंडे यांच्यातील संघर्ष चिघळला होता. विशेषतः करूणा मुंडे अधिक आक्रमक झाल्या होत्या. छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. आज याच विषायवरून करूणा मुंडे यांनी भाष्य करत चक्क धनंजय मुंडे यांचे कौतुक केले. त्यांच्या राजकीय संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत, 2009 ते 2019 दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जो संघर्ष केला, त्यात मी ही होते, असे करूणा मुंडे म्हणाल्या.

Karuna Munde On Dhananjay Munde News
Karuna Munde News: करुणा मुंडेंनी पुन्हा वात पेटवली; म्हणाल्या,'धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदामुळेच गुंडांना पाठबळ अन् कराडसारखे लोक मोठे...'

छगन भुजबळ यांनी 100 टक्के सत्य सांगितलं आहे. राजकारणामध्ये पोटचा वारसा नसून तो विचारांचा वारसा असतो, आणि आज ते धनंजय मुंडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरामध्ये वाद झाला होता, मात्र धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंसारखच तळागाळामध्ये जाऊन स्वत:चे व्यक्तित्व निर्माण केलं. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारस हे धनंजय मुंडेच आहेत. आणि त्यांची सून म्हणून मी सुद्धा.

Karuna Munde On Dhananjay Munde News
Dhananjay Munde emotional : 250 दिवस 'मीडिया ट्रायल' झाली, दोनदा मरता-मरता वाचलो; धनंजय मुंडे भावूक, आजारपणावरही भाष्य (Video)

धनंजय मुंडे यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, असेही करूणा मुंडे यांनी सांगीतले. पंकजा मुंडेंना हरवण्यामध्ये भाजपाचा हात होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं. त्यावेळी पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या, त्यावेळी एक भाऊ म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं आणि दोघा बहीण भावांनी एकत्र मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांचा आणि माझा काही वाद नाही, त्यांच्या वृत्तीचा आणि माझा वाद आहे.

आज एक नवीन पार्ट सुरू झाला आहे. मी प्रॉपर्टी विकून माझे मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवून या संघर्षामध्ये सहभागी झाले होते. पंकजाताई आज जरी म्हणाल्या मी वारसदार आहे, मुंडे साहेबांची तर नाही, धनंजय मुंडे हेच खरे राजकीय वारस आहेत, याचा पुनरुच्चार करूणा मुंडे यांनी केला. एकूणच धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या करूणा मुंडे यांनी अचानक नवऱ्याचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

FAQs

1. करुणा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं?
करुणा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस धनंजय मुंडेच आहेत.

2. या वक्तव्यामुळे काय प्रतिक्रिया उमटल्या?
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत.

3. गोपीनाथ मुंडेंचे वारस या विषयावर आधी काय मत होतं?
मुंडे कुटुंबातील सदस्यांमध्ये या वारशावरून नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसतात.

4. धनंजय मुंडेंनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे का?
अद्याप धनंजय मुंडेंनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुंडे कुटुंबातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com