Dhananjay Munde News : विपश्यनेनंतर धनंजय मुंडे रमले शिवमहापुराण कथेत!

Maharashtra Minister Dhananjay Munde, known for his recent Vipassana retreat, is now seen attending the Shiv Mahapuran Katha : एकीकडे हे राजकीय संकट असताना दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर कौटुंबिक वादाचे हल्लेही होत होते. या संपूर्ण काळात धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला.
Dhananjay Munde In Shivmahapuran Katha News
Dhananjay Munde In Shivmahapuran Katha NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे सध्या राजकीय संकटातून मार्गक्रमण करत आहेत. या सगळ्यापासून मनशांती लाभावी यासाठी त्यांनी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दहा दिवसांच्या शिबिराला हजेरी लावली होती. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शिवमहापुराण कथा श्रवण करतानाच प्रदीपजी मिश्रा यांचे आशीर्वादही घेतले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या हत्या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी अटकेत आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मीक कराड हा देखील आहे. वाल्मीक कराड याच्याशी असलेले संबंध धनंजय मुंडे यांना महागात पडले आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

एकीकडे हे राजकीय संकट असताना दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर कौटुंबिक वादाचे हल्लेही होत होते. या संपूर्ण काळात धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. (Beed News) नुकतेच या सगळ्या राजकीय आणि वैयक्तिक संकटातून मनशांती लाभावी यासाठी त्यांनी नाशिक जवळील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दहा दिवसांच्या शिबिराला हजेरी लावली होती. त्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय झाले होते. परळी विधानसभा मतदारसंघासह राज्य पातळीवरही ते पक्षाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसले.

Dhananjay Munde In Shivmahapuran Katha News
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची साधना पूर्ण, कुणालाच न भेटता पहाटे गुपचूप गेले निघून..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकताच वर्धापनदिन साजरा झाला या कार्यक्रमालाही मुंडे आवर्जून हजर होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आलेले धनंजय मुंडे, असा त्यांचा विशेष उल्लेख केला होता. एकूणच राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या धनंजय मुंडे यांनी आता अध्यात्माचाही आधार घेतल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे. भगवानगडाशी धनंजय मुंडे यांचे भावनिक नाते असल्यामुळे ते तिथे कायमच जात असतात.

Dhananjay Munde In Shivmahapuran Katha News
Beed News :'तर आमदाराला बाहेर निघू देणार नाही' शेतकऱ्यांचा इशारा

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित गोपीनाथ गडावरील कीर्तन आणि जयंतीच्या कार्यक्रमालाही धनंजय मुंडे आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथेचा लाभही धनंजय मुंडे यांनी घेतला. दरम्यान प्रदीप मिश्रा यांचे आशीर्वाद घेऊन शिवमहापुराण कथा व महोत्सवी पुण्यतिथीच्या समारोप प्रसंगी आयोजित महापंक्तीला महाप्रसाद देण्याचा मानही धनंजय मुंडे यांनी मिळवला.

Dhananjay Munde In Shivmahapuran Katha News
NCP Reunion: एकत्र येण्याच्या चर्चेचा दोन्ही ‘राष्ट्रवादीं’ना फायदा?

विसाव्या शतकातील महान संत वै. ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच प. पू. प्रदीप मिश्राजी यांच्या वाणीतून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचा आज समारोप होत आहे. याप्रसंगी चाकरवाडी येथे उपस्थित राहून प. पू. प्रदीप मिश्राजी, ह. भ. प. महादेव (तात्या) महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत शिवमहापुराण कथेचे श्रवण केले. या दुग्ध शर्करा योग सोहळ्याच्या समारोप प्रसंगी महापंगतीला महाप्रसाद देण्याचा मान आम्हा परळीकरांना दिल्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभारही मुंडे यांनी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com