Beed News : शिंदे-फडणवीस-पवार सरकारला 'ट्रिपल इंजिनचे सरकार' म्हणून विरोधक नेहमीच हिणवत असतात. आज (मंगळवारी) परळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते.
मागील तीन महिन्यापूर्वी राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता या तीन महिन्यात सरकारमध्ये नाराजी सुरू झाली आहे. ट्रिपल इंजिनमधील एक नाराज घटक देवेंद्र फडणवीसांना भेटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
हे सरकार नेमकं कोण चालवतंय? असा सवाल विरोधकांनी केला आहे. आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या गाडीचं स्टिअरिंग कृषीमंत्र्यांच्या हाती देताच गाडी बंद पडल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार कार्यक्रमाला जात असताना त्या गाडीचे स्टिअरिंग अजित पवार गटाचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हातात होते. पण ती गाडी सुरुच झाली नाही, गाडीचा गिअर अडकल्यामुळे गाडी पुढे जात नव्हती. तेव्हा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना गाडी बदलावी लागली. दुसऱ्या गाडीतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना घेऊन मुंडे रवाना झाले.
परळीत 'शासन आपल्या दारी' उपक्रम घेतला तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचाच वरचष्मा राहील ही भिती असल्याने भाजप आमदारांनी कार्यक्रमाला विरोध केला पण अखेर कार्यक्रम झालाच. भाजप आमदारांची ही भीती खरी ठरली आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी आमदारांना केवळ व्यासपीठ मिळाले पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची साधी संधीही आमदारांना मिळाली नाही.
गेल्या वर्षी राज्यात सत्तांतरानंतर महायुती सरकारने जिल्हानिहाय "शासन आपल्या दारी" उपक्रम हाती घेतला. सुरुवातीला बीडला कार्यक्रम व्हावा, यासाठी शिवसेना पदाधिकारी आग्रही होते. पंरतु, कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निधी नाही, असा सुर प्रशासनाने आळविला. त्यामुळे शासनाकडून विचारणा होऊनही प्रशासनाने गेल्या वर्षी कार्यक्रमाला नकार दिला.
सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आणि धनंजय मुंडे पालकमंत्री झाले.मुंडे यांनी हा कार्यक्रम परळीत घेण्यासाठी पुढाकार घेतला. परळीत कार्यक्रम झाला तर धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचाच कार्यक्रमावर वरचष्मा असेल, तसेच कार्यक्रमावर होणाऱ्या उधळपट्टीमुळे सामान्यांतून नाराजी असल्याचे मुद्दे पुढे करत भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कार्यक्रम नको असा सुर आळविला. सुरुवातीला कार्यक्रम रद्द होण्याची चिन्हेही होती. पंरतु, या विरोधानंतरही कार्यक्रम निश्चित करण्यात धनंजय मुंडे सरस ठरले. अखेर कार्यक्रम परळीत पार पडला.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने परळीमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रभु वैद्यनाथ चरणी नमस्तक झाले. यावेळी प्रभु वैजनाथ मंदिराचा 286 कोटीच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुंडे बंधू आणि भगिनी देखील उपस्थित आहेत. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.