Basavraj Patil BJP Entry : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण नव्हे; तर हे केंद्रीय मंत्री!

Dharashiv Congress News : कर्नाटकातील बिदर जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या मार्फत बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची रणनीती ठरल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती.
Basavraj Patil
Basavraj PatilSarkarnama
Published on
Updated on

अविनाश काळे

Dharashiv News : कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची घटिका अगदी समीप आली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज (ता. 27 फेब्रुवारी) सायंकाळी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजप प्रवेश केल्यामुळे बसवराज पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यामागे चव्हाण यांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाआधीच बसवराज पाटील (Basavraj Patil) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी हा प्रवेश घडवून आणल्याचे बोलले जाते. दरम्यान, पक्ष प्रवेशाच्या पूर्वी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी विधान भवनातील दालनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सदिच्छा भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Basavraj Patil
Maharashtra Budget 2024 : अजितदादांची खेळाडूंसाठी मोठी घोषणा; सुवर्णपदक विजेत्याला आता एक कोटीचे बक्षीस

बसवराज पाटील मराठवाड्यातील काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते आहेत. लिंगायत समाजातील एक प्रबळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाटील यांचा होमपिच असलेला उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा (Bhagwant Khuba) यांच्या मार्फत बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची रणनीती ठरल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती.

दरम्यान मंगळवारी सकाळी मंत्री खुबा आणि बसवराज पाटील या दोघांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता पाटील यांचा भाजपमधील (BJP) पक्ष प्रवेशाचा सोपस्कर राहिला आहे. तोही थोड्याच वेळात पार पाडला जाणार आहे. अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आता मराठवाड्यातील अनेक बडे नेते बसवराज पाटील यांचा भाजपमधील प्रवेश काँग्रेससाठी धक्कादायक ठरणार आहे.

धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळणार का?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही दिवसात राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपचे आभार मानले. एवढेच नाही, तर संपूर्ण नांदेड जिल्हा भाजपमय करण्याचा विश्वास राज्यातील वरिष्ठ नेत्यांना दिला.

Basavraj Patil
Tasgaon Politics : संजय पाटलांना होमग्राउंडमध्येच अडकवण्याचा डाव; विशाल अन्‌ चंद्रहार पाटलांनी तासगावमध्ये घातले लक्ष

माजी मंत्री बसवराज पाटील हे देखील मराठवाड्यातील एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामागेही धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द असल्याचे बोलले जाते. अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेताना राज्यातील नेत्यांनी योग्य टायमिंग साधले होते. राज्यसभा निवडणुकीचा मुहूर्त साधत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला होता.

राज्यसभेवर खासदारकी देत तत्काळ अशोक चव्हाण यांचे पुनर्वसन करण्यात आले. आता हाच फॉर्म्युला बसवराज पाटील यांच्या बाबतीतही धाराशिव लोकसभेची उमेदवारी देऊन राबवला जाऊ शकतो, अशीही चर्चा या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर होत आहे.

Edited By : Vijay Dudhale

Basavraj Patil
Maharashtra Interim budget 2024 : बाळासाहेब थोरातांनी पहिल्या तासातच सरकारला धारेवर धरले, ‘आम्ही रात्रभर जागचं राहावं का?’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com