Video Bhausaheb Andhalkar: विधानसभेपूर्वीच आंबेडकरांना मोठा धक्का; मराठवाड्यातील बड्या नेत्यानं सोडली साथ

Bhausaheb Andhalkar Resign Vanchit Bahujan Aaghadi:लोकसभा निवडणूक लढवून पक्षातून बाहेर पडणारे पुण्यातील वसंत मोरे यांच्यानंतर भाऊसाहेब आंधळकर हे दुसरे नेते आहेत.
Bhausaheb Andhalkar News
Bhausaheb Andhalkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही. त्यामुळे व्यथित होऊन मराठवाड्यातील बड्या नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

वंचितकडून धाराशिव लोकसभा लढवलेले भाऊसाहेब आंधळकर यांनी 'वंचित'चा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पटली नाही, असे आंधकर यांनी पक्ष सोडल्यानंतर माध्यमांना सांगितले. लोकसभा निवडणूक लढवून पक्षातून बाहेर पडणारे पुण्यातील वसंत मोरे यांच्यानंतर भाऊसाहेब आंधळकर हे दुसरे नेते आहेत.

भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव मोहिम काढली, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला, आंबेडकर हा प्रश्न सोडवू शकले असले, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे मी व्यथित झालो. यामुळे वंचितमधून बाहेर पडत आहे, असे आंधळकर यांनी स्पष्ट केले आहे.

भाऊसाहेब आंधळकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे (Barshi) रहिवासी आहेत. बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला (Dharashiv Lok Sabha Constituency) जोडलेला आहे. त्यामुळे बार्शीतील आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांचा पराभव झाला.

पोलिस खात्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर भाऊसाहेब आंधळकर यांनी 2011 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आंधळकर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ते धाराशिव लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. पण, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर आंधळकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com