PM Narendra Modi : यांची हिंमत पाहा, रोखला मोदी सरकारचा रथ...

Dharashiv residents oppose Modi Sarkar : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा ग्रामस्थांचा संताप अचानक अनावर का झाला?
Modi Sarkar
Modi SarkarSarkarnama
Published on
Updated on

शीतल वाघमारे

Dharashiv Political News :

केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाला अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. त्याला धाराशिव जिल्ह्याचाही अपवाद नाही. केंद्राच्या १४ योजनांची माहिती देणारा रथ सर्वत्र फिरवला जात असून त्याचे काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी या रथाला विरोध होत आहे. कारण या रथावर केंद्र सरकार नाही तर मोदी सरकार (Narendra Modi) असा उल्लेख आहे.

सध्या धाराशिव जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा ठिकठिकाणी सुरू आहे. परंतु जिल्ह्यात काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी विरोध होत आहे. जिल्ह्यातील लोहारा ग्रामस्थांनी या चित्ररथाला आक्षेप घेतला आहे. या चित्ररथावर 'मोदी सरकार म्हणजे विकासाची हमी' असे लिहिलेले आहे. मुळात योजना केंद्र सरकारची असताना व्यक्तीकेंद्रीत रथयात्रा का काढली जाते, याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे.

Modi Sarkar
Narendra Modi Maharashtra Tour : लोकसभा जिंकण्यासाठी नरेंद्र मोदींची पंचसूत्री; म्हणाले...

भारत विकास संकल्प यात्रेच्या माध्यमातून गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम केले जात आहे. असे असले तरी केंद्र सरकारची योजना असताना तिथे मोदी सरकार असा शब्द वापरला जात आहे. या शब्दाला लोकांचा विरोध होत आहे.

ही यात्रा 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडमधून सुरू झाली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात्रेला हिरवा कंदील दाखवला होता. ही यात्रा 25 जानेवारी 2024 पर्यंत देशभरातील 2 कोटी 60 लाख ग्रामपंचायती आणि चार हजारांहून अधिक शहरांचा प्रवास करत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विकसित भारत संकल्प यात्रेत प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. हा रथ ज्या गावात, शहरात जातो तिथे लोकांना सरकारी योजनांची माहिती दिली जाते. शिवाय गरजूंकडून लाभांसाठी अर्जही भरून घेतले जातात. तसेच लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील आणि योजनांच्या बाबतीतील अडचणी आणि शंका यांचे निरसनही जागेवर केले जाते..

लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आठवडी बाजार असल्याने लोकांची गर्दी होती. चित्ररथावरून योजनेची माहिती दिली जात असताना 'मोदी सरकार म्हणजे विकासाची हमी' यावर आक्षेप घेत मोदी सरकार नाही तर भारत सरकार म्हणा, याकडे लोकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

जनतेच्या पैशातून मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा (BJP) प्रचार का करता, असा सवाल लोक विचारत आहेत. कार्यक्रम भारत सरकारचा आहे की नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा आहे? तर मग केंद्रांच्या योजनांना मोदींच्या योजना असे का म्हणता? भारत सरकारपेक्षा मोदी मोठे आहेत का? असे आक्षेप ग्रामस्थांनी घेतले आहेत. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

(Edited by Avinash Chandane)

Modi Sarkar
Bharat Jodo Nayay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी नाकारली, बदलावे लागले ठिकाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com