Dharashiv Railway News : धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट

Ranajagjitsinha Patil On Dharashiv Tuljapur Solapur Railway Line : भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का?
Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha PatilSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Tuljapur Solapur Railway Line News :

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी मोबदला मंजूर करण्यात आला आहे. वाटाघाटीने ही भूसंपादन प्रक्रिया पार पडली असती तर लवादाकडे दाद मागण्याची सोय राहिली नसती. प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी थेट भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना लवादाकडे दाद मागण्याचा मार्ग शिल्लक राहिला आहे. पुढील दोन दिवसांत लवादाची नियुक्ती केली जाणार आहे.

विभागीय आयुक्तांकडे त्यासाठी प्रक्रिया सुरू असून आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करीत असल्याची माहिती आमदार Ranajagjitsinha Patil यांनी दिली. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले आहे, त्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी तातडीने लवाद नेमावा. या मागणीसाठी आपला रेल्वे विभागाकडे सतत पाठपुरावा सुरू होता.

Ranajagjitsinha Patil
Loksabha Election 2024 : महायुतीच्या मेळाव्यानंतर आता महाविकास आघाडीची परीक्षा!

सोमवार 22 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या महसूल आयुक्तांना लवाद म्हणून काम करण्यासाठी वरिष्ठ महसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी रेल्वे विभागाकडून पत्र देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तातडीने लवाद म्हणून जिल्हाधिकारी यांचीच नेमणूक करण्याबाबत मराठवाडा विभागाचे आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्याशी मी स्वतः फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लवाद नेमण्याबाबत आश्वस्त केल्याचे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

'न्याय मिळेपर्यंत लढा...'

सध्या राबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याबाबत प्रत्येक गावातील प्रमुख तक्रारी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी, शेतकरी व वकिलांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या अहवालातील महत्त्वपूर्ण निष्कर्षानुसार लवादासमोर कायदेशीर बाबी मांडल्यामुळे फायदा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांना रास्त मोबदला मिळावा यासाठी आपण कटिबद्ध असून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण लढा देत राहू, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. 30 महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत. एकूण 84 कि.मी. लांबीच्या या रेल्वेमार्गावर 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. या रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे करण्यात आले आहेत, अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

edited by sachin fulpagare

Ranajagjitsinha Patil
Bal Thackeray Birth Anniversary : भाजपने मनापासून बाळासाहेब ठाकरेंना स्वीकारले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com