Latur Rural Assembly Constituency : फसवणाऱ्या महायुतीपेक्षा काम करणाऱ्या काँग्रेसचा हात मजबूत करा

Maharashtra Assembly Election 2024: सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरच समाधान लातूरसाठी झटायला कायम बळ देतं. लातूर बाजार समितीच्या माध्यमातून मुरुडमध्ये रेशीम खरेदी केंद्राचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात येथील बाजारपेठ अधिक सुसज्ज करू.
Latur Rural Assembly Constituency
Latur Rural Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Latur News: राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आता हे लोक पुन्हा येतील आणि पुन्हा फसवतील. अशा फसवणाऱ्या महायुतीपेक्षा लोकांची कामे करणाऱ्या काँग्रेसचे हात मजबुत करा, असे आवाहन लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांनी मतदारांना केले. लातूर ग्रामीणच्या प्रचाराला वेग आला आहे.

धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा दाखला देत मतदारांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले आहे. हे करत असतानाच राज्यातील महायुती सरकारवर ते टीक करत आहेत. नुकताच लातूर ग्रामीण मधील लातूर तालुक्यातील गुंफावाडी येथे काँग्रेस व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.

जनतेला जे हवे ते करून दाखवणे सरकारचे काम आहे. पण भाजप - महायुती सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले. आता हे भाजपचे लोक पुन्हा येतील आणि पुन्हा फसवतील. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे हात अधिक मजबूत करा, असे आवाहन यावेळी धीरज देशमुख यांनी केले. आपली नाळ मातीशी जोडली गेली आहे, त्यामुळे लातूरच्या प्रगतीशिवाय आपल्याला दुसरे काही दिसत नाही.

Latur Rural Assembly Constituency
Latur Assembly Constituency : धीरज देशमुखांची गॅरंटी मी घेतो, तुम्ही फक्त त्याच्या पाठीशी उभे राहा..

रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे कित्येक वर्षापासून नदीवर पुल नसल्याने होणारी लोकांची अडचण दूर करण्यासाठी पूल बांधला. (Latur) सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरच समाधान लातूरसाठी झटायला कायम बळ देतं, असेही देशमुख म्हणाले. लातूर बाजार समितीच्या माध्यमातून मुरुडमध्ये रेशीम खरेदी केंद्राचे काम सुरू आहे.

येणाऱ्या काळात येथील बाजारपेठ अधिक सुसज्ज करू, तसेच येथील बाजार आवारात शेतकरी, आडते व्यापारी, हमाल व अन्य घटकांसाठी भौतिक सुविधा निर्माण करू, असा शब्द देऊन 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा, अशी साद धीरज देशमुख यांनी मतदारांना घातली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख दुसऱ्यांदा निवडणुक लढवत आहेत. इथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com