Dhnanjay Munde News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता , पण साधा बायपास रस्ता करता आला नाही..

Beed News : या भागातल्या जमिनींचा भाव प्रति एकर आता तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.
Dhnanjay Munde-Pankaja Munde News
Dhnanjay Munde-Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Parli : गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती, पण त्यांना साधा परळीतला बायपास रस्ता करता आला नाही. पण मी परळीचा (Parli) आमदार झालो अन् हा रस्ता करून दाखवला. आता इथल्या जमीनीचे भाव ३० लाखाहून एकराला तीन कोटींवर गेले आहेत. एवढी प्रगती कधी पाहिली होती का? असे विचारत आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा, प्रीतम या आपल्या बहिणींवर टीकास्त्र सोडले.

Dhnanjay Munde-Pankaja Munde News
Imtiaz Jalil On Atique, Ashraf Shot Dead : अतिक, अश्रफच्या हत्येनंतर इम्तियाज म्हणाले, जंगलराजमध्ये तुमचे स्वागत..

मी आमदार असेपर्यंत मतदारसंघातील कोकांचे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, असा माझा प्रयत्न असल्याचेही (Dhnanjay Munde) मुंडे म्हणाले. परळी मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलतांना धनंजय मुंडे यांनी पुन्हा मुंडे भगिनींवर अप्रत्यक्ष टीका केली. (Pankaja Munde) भगवान गडावर कडवटपणा नाहीसा करण्याचा संकल्प दोन्ही बहिण भावांनी केल्यानंतर त्यांच्यातील कटुता संपणार अशी आशा त्याचे समर्थक बाळगून होते.

मात्र राजकारणात आमचे विचार वेगळे आहेत, हे धनंजय मुंडे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. परळी मतदारसंघात मी आमदार झाल्यापासून प्रगती झाल्याचा दावा करतांना त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या बायपास रस्त्याचे उदाहरण दिले. (Beed) धनंजय मुंडे म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही मतदारसंघातील एक साधा बायपास रोड झाला नाही.(Marathwada) मात्र परळीकरांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि बायपास रोडचे काम पुर्ण झाले.

ते पूर्ण होताच इथल्या जमिनीचा भाव वाढला. ब्रह्मवाडी शिवारातील तुमच्या जमिनींचे पाच वर्षांपूर्वीचे भाव आणि आत्ताचे भाव यात फरक पडला की नाही? या भागातल्या जमिनींचा भाव प्रति एकर आता तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. तुमच्या तीस लाखांच्या जमिनी तीन कोटी रुपयांच्या झाल्या आहेत.

पाच वर्षात एवढी प्रगती कधी बघितली का? लोकांना रस्ता, वीज, घरकुल, पाणीपुरवठा, साफसफाई करणे किंवा एखादं घरकुल, सभागृह दिलं म्हणजे विकास केला असे म्हणता येत नाही. प्रत्येक नागरिकाचे जीवनामान सुधारले पाहिजे, त्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, तरच खरा विकास झाला असे म्हणता येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com