ऐनवेळी पत्ता कट झालेले शिरसाट म्हणाले, ‘मंत्रिपद मिळालं नाही; म्हणून एकनाथ शिंदेंना सोडून...’

मागील पाच वर्षांच्या सरकारमध्येसुद्धा मंत्रिपद मिळायला पाहिजे होते. पण नाही मिळालं. या वेळी आणखी प्रयत्न करू : शिरसाट
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील सरकारमध्येही मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होते, पण मिळालं नाही. यापुढे आणखी प्रयत्न करत राहू. पण मंत्रिपद मिळालं नाही; म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नाराज आहे, त्यांना सोडून चाललो आहे, पळून चाललो, असे काही होणार नाही, असे मंत्रिपद हुकलेले शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्पष्ट केले. (Didn't get a ministerial position; So I will not leave Eknath Shinde : Sanjay Shirsat)

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आज (ता. ९ ऑगस्ट) राजभवनावर पार पडला. या वेळी एकूण १८ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात भाजपच्या नऊ, तर शिंदे गटाच्या नऊ जणांचा समावेश होता. आज शपथ घेतलेले सर्वजण हे कॅबिनेट मंत्री असणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), सुधीर मुनगंटीवार (भाजप), चंद्रकांत पाटील (भाजप), विजयकुमार गावित (भाजप), गिरीश महाजन (भाजप), गुलाबराव पाटील (एकनाथ शिंदे गट), दादा भुसे (एकनाथ शिंदे गट), संजय राठोड (एकनाथ शिंदे गट), सुरेश खाडे (भाजप), संदीपान भुमरे (एकनाथ शिंदे गट), उदय सामंत (एकनाथ शिंदे गट), तानाजी सावंत (एकनाथ शिंदे गट), रवींद्र चव्हाण (भाजप), अब्दुल सत्तार (एकनाथ शिंदे गट), दीपक केसरकर (एकनाथ शिंदे गट), अतुल सावे (भाजप), शंभूराज देसाई (एकनाथ शिंदे गट), मंगलप्रभात लोढा (भाजप) यांचा समावेश आहे.

Sanjay Shirsat
सोलापूरच्या दोन देशमुखांवर तानाजी सावंत भारी; पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी

शिरसाट म्हणाले की, प्रत्येक आमदाराला आपले नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात असावे, असे वाटत असते. प्रत्येकाला वाटतं की कधी ना कधी संधी मिळावी. संधी मिळाली नाही नाराज आहे, असे प्रत्येक आमदार मनाशी ठरवायला लागले तर सर्वांनाच मंत्री करावे लागेल. आमच्याकडे (शिंदे गट) तर पन्नास लोक आहेत. त्यातील नऊ जणांनाच संधी मिळणार होती. उठावात जे आमच्याबरोबर होते, ज्यांनी आम्हाला साथ दिली आणि आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढले. त्यांना पसंती द्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणणे होते. त्यास आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला होता. सोमवारी रात्री आमची सह्याद्री अतिथीगृहात जी बैठक झाली, त्यात कोणाला संधी द्यायची. त्या घटकामधील मीही एक घटक होतो; म्हणून त्याची माहिती मलाही होती.

Sanjay Shirsat
अब्दुल सत्तार, संजय राठोड आक्रमक होताच शिंदे नरमले; कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी पहिल्या दिवसांपासून विश्वासाने होतो. शिंदे यांच्या नेतृत्वार असलेला माझा विश्वास, त्यांची काम करण्याची पद्धत, भविष्यात कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद शिंदे यांच्यामध्ये आहे; म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज आहे, कुठेतरी सोडून चाललो, पळून चाललो असं काही होणार नाही. सर्व आमदार आम्ही एकजुटीने काम करणार आहोत.

Sanjay Shirsat
Bacchu Kadu यांची खदखद बाहेर : मंत्रीपद आमचा हक्क, तो आम्ही मिळवणारच!

प्रत्येक आमदार मंत्री होण्यासाठी इच्छूक असतो, त्याप्रमाणे मीही इच्छूक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढील टप्प्यात पाहू. मागील पाच वर्षांच्या सरकारमध्येसुद्धा मंत्रिपद मिळायला पाहिजे होते. पण नाही मिळालं. या वेळी आणखी प्रयत्न करू, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com