Bacchu Kadu यांची खदखद बाहेर : मंत्रीपद आमचा हक्क, तो आम्ही मिळवणारच!

Eknath Shinde सरकारमध्ये कडू नसल्याने त्यांच्याकडून उघडपणे नाराजी
Bachhu Kadu
Bachhu KaduSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार झाला. अठरा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. या यादीत नाव नसल्याने प्रहार संघटनेचे (Prahar Sanghtna) बच्चू कडू (BachhuKadu) यांचे नाव नाही. त्याबाबत त्यांनी `माझं नाव असलं तरी चांगलं नसलं तरी चांगलं,` अशी उपरोधिक प्रतिक्रीया दिली आहे. (Government will not run without independence)

Bachhu Kadu
Jalgaon News: मंत्रीपदासाठी खानदेशच्या नेत्यांचे एकनाथ शिंदेकडे लॅाबिंग

उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले होते. त्यांच्या बंडखोरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यमंत्रीपद सोडून आल्याने त्यांचा समावेश होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज असल्याचे बोलले जाते.

Bachhu Kadu
Dhule News: धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,अमरिशभाई पटेल यांची संधी हुकली!

यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले, माझं नाव असलं तरी चांगलं नसलं तरी चांगलं. ते पुढे म्हणाले, मंत्रीपदापेक्षा शेतकऱ्यांच्या मुद्यावरून चर्चेत आल पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविणे हा माझा प्राधान्यक्रम आहे. असे असले तरीही, अपक्ष आणि प्रहार आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. त्याशिवाय सरकार होऊ शकत नाही.

बच्चू कडू प्रवासात होते. ते म्हणाले, यासंदर्भात मी आता मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे. मंत्रिपद आमचा हक्क, तो आम्ही मिळवणारच. सरकार मित्रपक्ष अपक्षांशिवाय राहू शकत नाही. मुख्यमंत्री लवकरच विधानभवनात येत आहेत मी तेथे पोहचतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com