Diliprao Deshmukh News : राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ञ संचालकपदी दिलीपराव देशमुख..

Marathwada : अजित पवार, माजी अर्थ राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
Diliprao Deshmukh News, Latur
Diliprao Deshmukh News, LaturSarkarnama

Latur : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ञ संचालकपदी राज्याचे माजी मंत्री, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातून तज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Diliprao Deshmukh News, Latur
March For Name Change Support News : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थानात १९ रोजी `हिंदू जन गर्जना`, मोर्चा..

राज्य सहकारी साखर संघ हा राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो. (Latur) तसेच कारखान्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कामगार, कर्मचारी यासाठी सरकार पातळीवर प्रशासन सोबत कारखान्याची बाजू मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेत असतो. (Marathwada) राज्यातून तज्ञ संचालकपदी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थ राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

दिलीपराव देशमुख यांचा सहकार व साखर उद्योगातील ४० वर्षांचा अनुभव पाहता त्यांची ही निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर परिवारातील सर्व ९ साखर कारखान्यांच्या कारभारावर त्यांची छाप राहिली आहे.

या संस्था सहकार क्षेत्रात अव्वल स्थानावर आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थां देखील त्यांच्या मार्गदर्शखाली कार्यरत आहेत. राज्यातून झालेली दिलीपराव देशमुख यांची निवड लातूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com