Nilanga Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी निलंगा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. निलंगा तालुक्यातील 68 गावे औसा विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गोची होत आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माननारा मोठा वर्ग या भागात असला तरी जिल्हा पातळीवरून या भागातील कार्यकर्त्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने त्या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पक्षात रहायचे की बाहेर पडायचे? अशी स्थिती झाली असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
औसा मतदारसंघातून भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात माजीमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाल्यानंतर काही वर्षापासून या भागातला संपर्क कमी झाला त्यातच त्यांनी आता भाजपमध्ये (BJP) प्रवेश केले असल्याने या भागातील कार्यकर्त्यांसाठी वाली कोण अशी स्थिती निर्माण झाली आहे.
निलंगा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर बसवराज पाटील मुरूमकर (Basawraj Patil Murumkar) यांनी पक्ष वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील काँग्रेस नेतृत्वाने गेल्या काही वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये छुपी नाराजी आहे. यामुळे या भागात काँग्रेस संघटना पूर्वीप्रमाणे दिसून येत नाही. काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, अशी भावना स्थानिक नेते-कार्यकर्त्यांमध्ये आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या भागातील कार्यकर्त्यांची गरज भाजपा, काँग्रेस नेतृत्वाला भासते. या भागातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, कृषी सभापती, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती असे पदे भुषवलेले मातब्बर कार्यकर्ते आहेत. केवळ जिल्हापरिषद, पंचायत समिती, बाजार समिती अशा निवडणुकी पुरती आठवण कार्यकर्त्यांची येते त्यानंतर कोणीही विचारत नाही अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आपल्या भागातील अडचणी, समस्या कोणाकडे मांडायच्या असा प्रश्न निर्माण होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.