जिल्हा दूध संघ : आधी बागडेंना विरोध आता, एकत्र प्रचार..

बागडेंना विरोध करण्यासाठी ज्यांना बळ दिले गेले, ते आता एकटे पडले असून जिल्हा दुध संघात पुन्हा सर्वपक्षीय संचालक असेच चित्र पहायला मिळणार आहे. (Mla Haribhau Bagde)
Danve-Bagde-Kale-Sattar
Danve-Bagde-Kale-SattarSarkarnama

औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडतांना दिसत आहेत. ही निवडणूक होऊ नये यासाठी अटोकाट प्रयत्न करणारे व बागडे (Mla Haribhau Bagde) यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे काॅंग्रेसचे डाॅ. कल्याण काळे आता त्यांच्याच प्रचार करतांना दिसत आहेत. (Bjp) १४ संचालकांपैकी ७ बिनविरोध निवडून आलेले आहेत.

पण यामध्ये गेली अनेक वर्ष दूध संघात संचालक, अध्यक्ष असलेल्या बागडेंचा समावेश नव्हता. उलट त्यांच्या नावावर एकमत न झाल्यामुळे सात संचालकांसाठी येत्या २२ जानेवारी रोजी मतदान होत आहे. (Aurangabad) आधी एकमेकांना विरोध करणारे काळे-बागडे (Abdul Sattar) आता एकत्र आले असून एकता सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जात आहेत.

३४६ मतदार सात संचालकांसाठी मतदान करणार असून आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. बागडेसह एकता पॅनलचे सर्व सात संचालक विजयी होतील असा दावा, बागडे, काळे, सत्तार-दानवे या नेत्यांनी काल झालेल्या बैठकीत केला आहे. एकता विकास पॅनलच्या विरोधातील पॅनल आता एकाकी पडले आहे.

बागडेंना विरोध करण्यासाठी ज्यांना बळ दिले गेले, ते आता एकटे पडले असून जिल्हा दुध संघात पुन्हा सर्वपक्षीय संचालक असेच चित्र पहायला मिळणार आहे. शिवसेना-भाजप-काॅंग्रेस या तीन पक्षाची युती या निमित्ताने झाली आहे. सुरुवातीला बिनविरोधचे प्रयत्न डाॅ. कल्याण काळे यांनी हाणून पाडले.

Danve-Bagde-Kale-Sattar
भाजपला पराभवाची भिती; नवाब मलिकांनी दिला ADR रिपोर्टचा हवाला

७ संचालकांवर दोन्ही बाजूंनी एकमत झाले, परंतु बागडे यांच्यासह इतर सात संचालकांच्या नावावर शेवटपर्यंत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आता या सात जागा निवडून आणण्याची जबाबदारी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे, हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्रीत बैठक घेऊन एकता सहकार विकास पॅनलच्या सर्व सातही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com