Minister Atul Save In vegetable Market : सरकारी योजनांचा लाभ मिळतो का ? जाणून घेण्यासाठी सहकारमंत्री सावे थेट भाजीमंडईत...

Bjp : भाजी विकण्यासाठी घेऊन आलेला सामान्य शेतकरी, व्यापारी वर्गासोबत सावे यांनी संवाद साधला.
Minister Atul Save In vegetable Market News
Minister Atul Save In vegetable Market NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : केंद्रातील सरकार असो की राज्यातले, जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा नियमितपणे घेत असतात. (Cooperative Minister) आपल्या खात्याशी संबंधित अधिकारी, सचिवांचा वातनुकूलित केबिनमधील बैठका आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांमध्ये जावून माहिती घेण्याचा प्रसंग तसा क्विचतच.

Minister Atul Save In vegetable Market News
Lasur Market Committee News : कारखाना हातून गेल्यानंतर आमदार बंब यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला..

पण राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी नुकतीच थेट मुंबईतील ओपेरा हाऊस भाजीमंडई गाठत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ खरचं सर्वसामान्यांना होतोय का? त्यांना त्याबद्दल काय वाटते? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. `सरकारनामा`शी बोलतांना सावे म्हणाले, भाजी विक्रेत्यांच्या समस्या काय आहेत? हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

(Bjp) मंत्री म्हटलं की दौरे, बैठका, सभा असा भरगच्च कार्यक्रम असतो. तर अशा भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढून सावे यांनी भाजीमंडईत फेरफटका मारून केलेली पाहणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे झाले असे की, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून, पक्ष कार्यकर्त्यांसह एका कार्यक्रमातून दुसरीकडे जात असताना पक्षाच्या कार्याचा विषय सुरू होता. (Marathwada) योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आग्रह पक्ष कार्यकर्त्यांचा असावा अशी चर्चा सुरू असतानाच सहकार मंत्री अतुल सावे यांनी अचानक ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. (Maharashtra) गाडीतून ते उतरले आणि थेट भाजीमंडईत पोहचले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? पक्ष कार्यकर्त्यांचे त्याकडे किती लक्ष आहे? शेवटच्या घटकाला खरंच लाभ मिळतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट भाजी विक्रेत्यांशीच संवाद साधला. भाजी विकण्यासाठी घेऊन आलेला सामान्य शेतकरी, व्यापारी वर्गासोबत सावे यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजावून घेत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत का? याची खातरजमा केली.‌

त्यासोबतच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांना माहिती दिली जाते का? योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत होते का? असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या असंख्य योजना आहेत, पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजाणी झाली पाहिजे, याकडे सावे यांचा कटाक्ष असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com