Rahul Gandhi: आधी फोनवरून सांत्वन, आता थेट महाराष्ट्रात येऊन सन्मान : भाजपने साडी नेसवलेल्या नेत्याच्या मागे राहुल गांधी पहाडासारखे उभे

Dombivali BJP Leaders Wear Saree Congress Leader News: पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांनी पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसविली होती. त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला होता.
Congress vs bjp
Congress vs bjp Sarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. संतप्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याला साडी नेसवली होती. या घटनेचा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याची दखल घेत काँग्रेस नेते, विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यांनी पगारे यांना थेट फोन करुन "मामा तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्यासोबत आहे," असे सांगत धीर दिला आहे.

राहुल गांधी हे लवकरच मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात ते डोंबिवली येथील पगारे मामांची भेट घेणार असून त्यांचा सन्मान करणार असल्याचे विश्वनीय सुत्रांनी सांगितले. विजयादशमी आधीच राहुल गांधी मराठवाड्यातील पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मामा पगारे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांना कोणी तरी पाठविली होती. ती त्यांनी पुढे फॉरवर्ड केली. त्यामुळे, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांनी पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसविली होती. त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला होता.

यानंतर पगारे यांनी प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असताना राहुल गांधी यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारणा केली होती. या प्रकरणावरुन काँग्रेस अन् भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.

Congress vs bjp
Sanjay Savkare: शेतकऱ्यांचे अश्रु पुसायला गेले की पिकनिकला? नुकसानग्रस्त भागात मंत्र्यांचं 'फोटोसेशन'

मोदी हे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्याबाबत असा घृणास्पद प्रकार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असे नंदू परब यांनी माध्यमांना सांगितले होते. प्रकाश पगारे या काँग्रेस पदाधिकाऱ्याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com