
बीड ः अतिवृष्टीमुळे मराठवाडयातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पॅकेजची केवळ घोषणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिली जावी आणि त्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली.
राज्यपाल भगतहसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनाही त्यांनी निवेदने पाठवली आहेत. जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीला मोठी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांसह जमिनी, घरे असे मोठे नुकसान झाले. याची पाहणीही पंकजा मुंडे यांनी केली.
पाहणी दौऱ्यानंतर लगेचच त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या. सर्वच छोटया, मोठ्या नद्यांना पुरामुळे पाणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जिवित व वित्त हानी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे.
शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट आले. मराठवाड्यात ३५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांची तब्बल २५ लाख हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ९१ जणांचा मृत्यु झाला पैकी २२ बळी दोन दिवसात गेले. अतिवृष्टीने बळीराजा पुर्ण कोलमडून गेला असून त्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट तर आलेलेच आहे पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी, नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यांना मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे. केवळ घोषणा करून भागणार नाही तर तातडीने व वेळेवर मदत प्रत्यक्ष द्यावी असेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.