Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : डॉ. अभिजित चौधरी यांची नऊ महिन्यातच बदली; जी. श्रीकांत नवे आयुक्त...

Municipal Corporation : घरकूल योजनेच्या निविदेचा घोटाळा समोर आला. तेव्हापासून डॉ. चौधरी यांचे विरोधक वाढले.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation NewsSarkarnama

Marathwada : राज्य शासनाने केवळ नऊ महिन्यात महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची वस्तू व सेवा कर सहआयुक्तपदी बदली केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation) त्यांच्या जागेवर वस्तू व सेवा कर सहआयुक्त जी. श्रीकांत पदभार घेणार आहेत. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या डॉ. चौधरी यांच्या बदलीसाठी शहरातील काही लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी फिल्डींग लावल्याची चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News
Chhatrapati Sambhajinagar APMC News : वज्रमुठ सुटली, शिंदेंच्या शिलेदारांनी गड राखले..

डॉ. चौधरी यांची २२ जुलै २०२२ ला शासनाने सांगलीच्या जिल्हाधिकारी पदावरून त्यांची छत्रपती संभाजीनगरात महापालिका आयुक्तपदी बदली केली होती. (Municipal Corporation) दोन ऑगस्टला २०२२ ला पदभार हाती घेताच त्यांनी महापालिकेसह स्मार्ट सिटीच्या विकास कामांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. पंतप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल प्रकल्पांतील अनियमितता डॉ. चौधरी यांच्यामुळेच उघडकीस आली.

घरकूल प्रकल्पाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती नियुक्त करून या समितीच्या अहवालावरून ४० हजार घरांचा प्रकल्पच रद्द केला. (Aurangabad) विशेष म्हणजे, केंद्राने देखील घरकुल निविदा घोटाळ्याची गंभीरतेने दखल घेत ईडी चौकशी सुरू केली आहे. (Marathwada) डॉ. चौधरी यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे महापालिकेतील फायलींचा प्रवास मंदावल्याची ओरड अधिकारी वर्गातून होती. तसेच स्थानिक सत्ताधारी पक्षातील काही राजकारण्यांची व त्यांच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची कामे रोखली गेल्याने डॉ. चौधरी यांच्या बदलीसाठी विशेष प्रयत्न सुरू होते.

अखेर डॉ. चौधरी हे विदेश दौऱ्यावर असताना मंत्रालयातून मंगळवारी (ता. दोन) त्यांच्या बदली आदेश जारी करण्यात आले. जी. श्रीकांत यांच्या नावाची चर्चा डॉ. अभिजित चौधरी छत्रपती संभाजीनगरात येण्यापूर्वीच होती, पण तसे झाले नाही. दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी डॉ. चौधरी यांच्या बदलीचे प्रयत्न सुरू केले होते. आगामी काळात महापालिकेची निवडणूका होणार आहे. त्यामुळे डॉ. चौधरी अडचणीचे ठरू शकतात, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर डॉ. चौधरी यांच्या बदलीचे आदेश निघाल्याचे सूत्रांनी सांगितले.

घरकूल घोटाळ्याची चौकशी नडली

पदभार घेताच डॉ. चौधरी यांनी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या काळातील काही कामांचा बारकाईने अभ्यास केला. त्यात घरकूल योजनेच्या निविदेचा घोटाळा समोर आला. तेव्हापासून डॉ. चौधरी यांचे विरोधक वाढले. कामात अभ्यासूवृत्ती आणि पारदर्शकतेमुळे ते महापालिकेतील अधिकाऱ्यांची लॉबी व काही राजकारण्यांसाठी अडचणीचे ठरत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com