Bjp : औरंगाबादच्या नामांतरावरून सुरू असलेले राजकारण काही केल्या थांबतांना दिसत नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून औरंगजेबाची कबर हलवण्याची मागणी केली जात आहे.
आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी देखील या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले. (Bjp) अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नामांतराच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आणि शिवसेना आमदारांकडून औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवण्याची होणारी मागणी यावर देखील कराड यांनी भाष्य केले.
कराड म्हणाले, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी ही मागणी केल्याचे मी टीव्हीवर पाहिले. मी त्यांचे अभिनंदन करतो, माझा देखील त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. कुठल्याच राजकीय पक्षाने याला विरोध केला नाही. इम्तियाज जलील यांचा विरोध हा राजकारणासाठी आहे. त्यांना आपली राजकीय पोळी या निमित्ताने भाजून घ्यायची आहे.
परंतु माझे आता त्याना आवाहन आहे, आंदोलन मागे घ्यावे. केंद्राने नामांतराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्यांनी विकासावर बोलावे. एखादा प्रकल्प आणण्यासाठी पाठपुरावा करावा, मागणी करावी मी त्यांच्यासोबत दिल्लीत संबंधित कामासाठी जाईन. पण केवळ राजकारणासाठी आंदोलन करत लोकांना वेठीस धरू नये. त्यांना औरंगाबादबद्दल एवढेच प्रेम असेल तर त्यांना आता बिहारमध्ये जावून राहावे लागेल, कारण या शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर झाले आहे, असा टोला देखील कराड यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.