Chandrakant Khaire : तुमच्याच मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करतायेत, मंत्रीपदाचा राजीनामा द्या..

Abdul Sattar : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आठवडाभरात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Chandrakant Khaire-Abdul Sattar
Chandrakant Khaire-Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : अब्दुल सत्तार हे राज्याचे कृषीमंत्री आहेत, विशेष म्हणजे आपल्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आहेत. असे असतांना जिल्ह्यात आठवडभरात सहा (Farmers) शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्या सिल्लोड मतदारसंघातील तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. याची नैतिक जबाबदारी घेवून सत्तार यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

Chandrakant Khaire-Abdul Sattar
Imtiaz Jalil News : तुम्ही न्यायालयाला मोजले नाही, आम्ही तुम्हाला मोजत नाही ; आंदोलन सुरूच राहणार..

एकीकडे तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त असतांना शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडल्याने शेतकऱ्यांचे गहू, मका, हरभरा, भाजीपाला, फळबागा आदीचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Chandrakant Khaire) सततच्या नुकसानीमुळे बळीराजा खचत चालला आहे. (Abdul Sattar) कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आठवडाभरात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातीलच तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे केवळ शेतकऱ्यांना वेळेवर मदत न करण्यामुळे घडत आहे. अब्दुल सत्तार यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खैरे यांनी केली.

खैरे यांनी आज कन्नड तालुक्यातील पिशोर, शफेपुर, भिलदरी, आंबा, उपळा, आदी गावांत जावून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. दोन दिवसांपासून गंगापूर, वैजापुर, कन्नड आदी तालुक्यातील गावांना भेटी देत खैरे हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही शेतकऱ्यांचा त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी देखील खैरे यांनी केली.

तसेच या मागणीसाठी सोमवारी १३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान पाहणी दौऱ्यात उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख संजय मोटे, तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, युवासेना जिल्हा समनव्यक उमेश मोकासे, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, सभापती अशोक दाबके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com