Nanded BJP News : डॉ. गोपछडे या वेळी पण स्टेथोस्कोप घालून उमेदवारी अर्ज भरणार का ?

Political News : डॉ. अजित गोपछडे हे नांदेड जिल्ह्यातील असून, पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
Ajit Gopchade
Ajit Gopchade Sarkarnama
Published on
Updated on

Parbahani News : भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. 2020 मधील विधानपरिषद निवडणुकीवेळी डॉ. अजित गोपछडे यांचे नाव पक्षाने जाहीर केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.

डॉ. अजित गोपछडे हे नांदेड जिल्ह्यातील असून, पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जातीय समीकरणाचा विचार करता नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लिंगायत समाज आहे. गोपछडे हे लिंगायत समाजातील असल्यामुळे पक्षाने गोपछडे यांना राज्यसभेची संधी दिल्याचे सांगण्यात येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण व डॉ. अजित गोपछडे या दोघांना राज्यसभेची संधी दिल्याने नांदेड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे.

Ajit Gopchade
Ahmednagar News : शिवसेनेच्या नगरसेवकावर रोखली गावठी पिस्तूल, खटका दाबणार तेवढ्यात...

2020 मध्ये विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पक्षाने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. गोपछडे यांनी उमेदवारी अर्जही भरला. मात्र, ऐनवेळी गोपछडे यांचे नाव वगळून लातूर जिल्ह्यातील रमेश कराड (Ramesh Karad) यांना उमेदवारी देण्यात आली. 2020 मध्ये सर्वत्र कोरोना संकटाचे सावट होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना डॉ. गोपछ्डे गळ्यात स्टेथोस्कोप घालून आले होते.

भाजपच्या (Bjp) वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून काम चालू आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे फोटोसेशनही चांगलेच व्हायरल झाले होते. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने गोपछ्डे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या वेळीसुद्धा ते गळ्यात स्टेथोस्कोप घालून येणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 2020 मध्ये स्टेथोस्कोप घालून उमेदवारी अर्ज भरला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांची संधी हुकली होती. या वेळीही गळ्यात स्टेथोस्कोप घालून उमेदवारी अर्ज भरल्यास काही विपरीत घडल्याची शक्यता लक्षात घेता, यावेळी कुठलाही धोका पत्करायचा नसल्यामुळे गोपछडे स्टेथोस्कोप घालण्याचे टाळतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्यावेळी कोरोना होता, स्टेथोस्कोप ही डाॅक्टरांची ओळख आणि त्याकाळातली गरजही होती.

चार वर्षांनी मिळाली संधी

कोरोना काळात हुकलेली संधी त्यांना चार वर्षांनी का होईना पण मिळाली आहे. उच्चशिक्षित आणि पेशाने डाॅक्टर असल्यामुळे त्या घटनेचा असा काही संबंध ते लावतील असे वाटत नाही. तरीसुद्धा त्यांच्या त्यावेळी स्टेथोस्कोप घालून उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा आता राज्यसभेचा अर्ज भरतानाही होत आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Ajit Gopchade
Ajit Gopchade : रमेश कराडांसाठी आमदारकी सोडणाऱ्या गोपछडेंना मिळाले खासदारकीचे बक्षीस

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com