Dr. Karad : खैरेंनी फक्त पत्रचं दिले, मी प्रत्यक्षात काम करून दाखवले..

केंद्रातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांच्याकडून मराठवाड्यासाठी सी डाॅपलर यंत्रणा मंजुर करून आणली आहे. म्हैसमाळ येथे त्याचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. (Dr. Bhagwat Karad)
Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Dr.Bhagwat Karad-Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर मला केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील यात मोठा वाटा आहे. मंत्री झाल्यापासून अगदी कामी कालावधीत मी औंरगाबाद जिल्ह्यासाठी महत्वाचे प्रकल्प मंजुर करून आणण्याचे काम केले. माझे जुने मित्र माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) नेहमी सांगतात की मी यासाठी आधीच पत्र दिले होते. (Bjp) पण हे असे झाले की मुलगी पाहिली नाही, लग्नही केले नाही आणि नुसताच गाजावाजा करायचा, असा टोला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापूर-धुळे या महामार्गाचे लोकार्पण व जिल्ह्यातील विविध महामार्ग व रस्त्यांच्या कामांचे भूमीपुजन आज करण्यात आले. यावेळी भाषण करतांना डाॅ. कराड यांनी आपण मंत्री झाल्यापासून औरंगाबाद व मराठवाड्यासाठी (Marathwada) काय केले? हे सांगतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला.

डाॅ. कराड म्हणाले, राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली. त्यानंतर गडकरी साहेब व इतरांच्या आशिर्वादाने मला मंत्री पदाची संधी मिळाली. त्यानंतर अत्यंत कमी कालावधीमध्ये केंद्रात पाठपुराव करून मी औरंगाबाद जिल्ह्यासाठी अनेक योजना, प्रकल्प मंजुर करून आणले. साडेचार हजार कोटींची गॅस पाईपलाईन योजना, पंतप्रधान अवास योजनेतून गोर-गरीबांसाठी ४० हजार घरकुलांच्या योजनेला नुकतीच मार्चमध्ये मंजुरी मिळाली.

Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Nitin Gadkari : मराठवाड्यातील सगळे रस्ते २०२४ पर्यंत अमेरिकेच्या दर्जाचे बनवणार..

मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. कधी पाऊल पडेल कधी नाही याचा कुठलाही अंदाज येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या भागात होत होते. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी केंद्रातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांच्याकडून मराठवाड्यासाठी सी डाॅपलर यंत्रणा मंजुर करून आणली आहे. म्हैसमाळ येथे त्याचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे.

पर्यटनाला चालना मिळावी यासाठी देखील मी सातत्याने प्रयत्न करत आहेत. ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यासाठी आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारने देखील निधी दिला नव्हता. पण मी पाठपुरावा करून देवगिरी किल्ल्यावर लाईड अॅन्ड साऊंड शोसाठी निधी मंजुर करून आणला आहे. या शिवाय बिबी का मकबरासाठी केद्रांकडून निधी मंजुरीचे पत्र मिळाले असल्याचे कराड यांनी सांगितले. याशिवाय डीएमआयसीमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेक्शन सेंटर देण्याची मागणी देखील कराड यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com